मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या आशिया चषकाच्या आयोजनावर अखेर मोहोर उमटली आहे. ही स्पर्धा आता श्रीलंका व पाकिस्तान संयुक्तरित्या आयोजित करणार असून, 31 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा शुभारंभ होईल.
नियोजित कार्यक्रमानुसार आशियाच्या चषकाचे आयोजन पाकिस्तान करणार होता. मात्र, आधी भारत व त्यानंतर इतर देशांनी विरोध केल्यामुळे पाकिस्तान व श्रीलंका आशिया चषकाचे आयोजन करतील. या आशिया चषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान व नेपाळ हे संघ सहभागी होतील. स्पर्धेत तेरा सामने खेळले जाणार असून, चार सामने पाकिस्तानात खेळले जातील.
साखळी फेरीत प्रत्येकी तीन संघांचे दोन गट केले जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांना सुपर फोरमध्ये संधी मिळेल. त्यानंतर त्यातून दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
स्पर्धेचे प्रारूप पाहता भारत व पाकिस्तान तीन वेळा भिडण्याची शक्यता आहे. या आशिया चषकानंतर वनडे विश्वचषक भारतात खेळला जाईल.
बातमी अपडेट होत आहे…
(ACC Announced Asia Cup 2023 Schedule Tournament Starts On 31 August)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा