सध्या भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बाॅर्डर-गावसकर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना (3 ते 7 डिसेंबर) दरम्यान खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे होणारी कसोटी ही त्यांची शेवटची कसोटी ठरू शकते, हा रिपोर्ट तेव्हा आला, जेव्हा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मेलबर्न कसोटीत भारताला 184 धावांनी पराभव करावा लागला होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. या रिपोर्टचा दावा आहे की बीसीसीआयचे उच्च अधिकारी आणि निवडकर्ते या निर्णयाबद्दल आधीच बोलले आहेत आणि रोहित आपला विचार बदलेल अशी शक्यता फारच कमी आहे. या घोषणेची नेमकी वेळ निश्चित करण्यात आली नसली, तरी सिडनी येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यानंतर ते होईल असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
तथापि, जर भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी पात्र ठरला, तर रोहित निवडकर्त्यांना त्याला राहण्याची परवानगी देण्याचा प्रयत्न करू शकतो. बॉर्डर-गावसकर मालिकेतही रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम आहे. गेल्या 5 डावात त्याने केवळ 31 धावा आणि शेवटच्या 14 डावात 155 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी कसोटीत 2013 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 67 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 116 डावात फलंदाजी करताना 40.57च्या सरासरीने 4,301 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 18 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजच्या या खेळाडूची आश्चर्यकारक कामगिरी, एकाच चेंडूत दिल्या 15 धावा
आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या ‘या’ स्टार खेळाडूने झळकावले सलग तिसरे शतक
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्राॅफीमध्ये धमाकेदार खेळी