---Advertisement---

‘त्याला पाहिजे तितकं श्रेय मिळालं नाही…’, कोणत्या भारतीय खेळाडूविषयी बोलला एबी डिविलियर्स

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 2:14 PM
AB-De-Villiers
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. कसोटी मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रांचीमध्ये सुरू झाला. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनने दोन मोठे विक्रम नावावर केले. अश्विन मागच्या दशकातील भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार एबी डिविलियर्स याने भारतीय फिरकीपटूविषयी मोठे विधान केले आहे.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. पहिल्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने कसोटी कारकिर्दीतील आपल्या 500 विकेट्स पूर्ण केल्या. तसेच शुक्रवारी सुरू झालेल्या रांची कसोटी सामन्यात अश्विनने इंग्लंडविरुद्ध 100 कसोटी विकेट्सचा आकडा पूर्ण केला. अश्विन अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स त्याच्याच नावावर आहेत.

असे असले तरी, माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधार एबी डिविलियर्स (AB de Villiers) याच्या मते अश्विनला त्याच्या प्रतिभेनुसार महत्व मिळाले नाही. डिविलियर्सच्या मते अश्विन भारताचा महत्वाचा खेळाडू आहे. पण संघात त्याला त्या तुलनेत महत्व दिले गेले नाही. अश्विनने 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्यानंतर डिविलियर्स आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला, “काय शानदार कामगिरी आहे. शुभेच्छा अश्विन. तू त्या घातक गोलंदाजांपैकी एक आहे, ज्यांच्यासोबत मी खेळलो आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये तू भारतीय संघाची अमुल्य संपत्ती आहेस. अश्विन खऱ्या अर्थाने या खेळाचा दिग्गज आहे. पण त्याने केलेले प्रदर्शन आणि भारतीय संघासाठी पार पाडलेल्या भूमिकेसाठी त्याला पुरेसे श्रेय मिळाले नाही.”

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध रांची कसोटी सामन्यातही अश्विनच्या विकेट्सचा आकडा वाढत आहे. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडची धावसंख्या 5 बाद 112 होती. संघासाठी यापैकी एक विकेट अश्विनने घेतली. दिग्गज जॉनी बेअरस्टो याला अश्विनने शुक्रवारी वायचीत केले. (According to AB de Villiers, this Indian player did not get enough credit)

महत्वाच्या बातम्या – 
SL vs AFG । वानिंदू हसरंगा विरुद्ध अंपायर; म्हणाला, ‘दुसरं काम शोधा…’
IND vs ENG । पदार्पणाच्या सामन्यात आकाश दीपकडून पाहुण्यांना तीन मोठे धक्के! पहिल्याच सत्रात इंग्लंडची पडझड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---