---Advertisement---

IND vs ENG । पदार्पणाच्या सामन्यात आकाश दीपकडून पाहुण्यांना तीन मोठे धक्के! पहिल्याच सत्रात इंग्लंडची पडझड

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 10:40 AM
Aakash Deep
---Advertisement---

भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रांचीमध्ये सुरू झाला. आकाश दीप याला कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी शुक्रवारी कर्णधार रोहित शर्मा याने दिली. कसोटी पदार्पणानंतर आपल्या पाचव्या षटकात आकाशने गुणवत्ता सिद्ध केली.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिका सध्या रंगात आहे. यजमान भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे. रांची कसोटीत भारताने विजय मिळवला, तर कसोटी मालिका त्यांच्या नावावर होईल. दुसरीकडे इंग्लंड संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी चौथा कसोटी सामना खेळत आहे. आकाश दीप याला शुक्रवारी सकाळी नाणेफेक होण्याआधी कसोटी कॅप मिळाली. रांची कसोटीच्या पहिल्या सत्रात आकाशने अप्रतिम गोलंदाजी केली.

इंग्लंड संघ फलंदाजी करत अशताना डावातील 10व्या षटकात आकाश दीप गोलंदाजीला आला. षटकातील दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर आकाशने अनुक्रमे ओली पोप आणि बेन डकेट यांना तंबूत धाडले. हे दोन्ही फलंदाज इंग्लंड संघासाठी महत्वाचे होते, पण आकाशच्या भेदक गोलंदाजीपुढे दोघांनी शरणागती पत्करली.

इंग्लंडच्या डावातील 12व्या षटकात आकाश दीप पुन्हा गोलंदाजीला आला. पोप आणि डकेट यांच्यानंतर डावातील 12व्या षटकात सलामीवीर झॅक क्रॉली आकाशची शिकार बनला.

( 3 wickets for Akash Deep on his first spell in Test debut)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024 : अखेर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दोन संघात रंगणार आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा पहिला सामना
IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का, मोहम्मद शमी आयपीएल 2024 मधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---