---Advertisement---

IPL 2024 : अखेर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दोन संघात रंगणार आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा पहिला सामना

On: गुरूवार, फेब्रुवारी 22, 2024 5:30 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 17 व्या हंगामाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आज आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. तसेच आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी दोन दिवसांपूर्वीच आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत अपडेट दिली होती. 22 मार्च पासून आयपीएलच्या रणधुमाळीला सुरुवात होईल, असे अरुण धुमाळ यांनी सांगितलं होतं. देशात यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याचवेळी आयपीएलचा थरारही होणार आहे. 

याबरोबरच, आयपीएलच्या थराराला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तसेच आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये होणार आहे. त्यानुसार, पहिला सामना धोनीच्या चेन्नई विरोधात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर याच्यात होणार आहे. याबरोबरच  चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून नुकतेच आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

तसेच आयपीएल 2024 चा पहिला सामना हा 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात होणार आहे. मात्र 24 मार्च रोजी होणाऱ्या सामन्याकडेही सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. तर गेल्या हंगामात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या होता. आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे. त्यामुळे हा सामना सर्वात हाय व्होल्टेज असण्याची शक्यता आहे. गुजरातचे नेतृत्व हे सर्वात युवा कर्णधार, 24 वर्षाचा शुभमन गिल करणार आहे.

दरम्यान, 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात करण्याची योजना असल्याचं अरुण धुमाळ यांनी सांगितलं होतं. यंदाच्या आयपीएल हंगामाचं पहिल्या 21 दिवसांचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर झालं आहे. त्यानंतर उर्वरित सामन्याचे वेळापत्रक लोकसभा निवडणुकीचा तारखा जाहीर झाल्यावर करण्यात येईल, असे धुमाळ यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---