दक्षिण आप्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जवळचे मित्र आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये हे दोन्ही दिग्गज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी अनेक वर्ष एकत्र खेळले. आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर डिविलियर्सने विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकी दिग्गजाच्या मते विराट आगामी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो.
विराट कोहली (Virat Kohli) यावर्षी आपल्या कारकिर्दीतील चौथा वनडे विश्वचषक खेळणार आहे. 2011 साली भारताला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघापैकी केवळ दोन खेळाडू यावर्षीच्या विश्वचषकात भारतासाठी खेळतील. एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरा दुसरा खेळाडू आहे रविचंद्रन अश्विन. विराट कोहली यापूर्वी अनेकदा भारतासाठी मॅच विनरच्या भिमिकेत दिसला आहे. त्याने अनेकदा हातातून निसटलेला सामना संघासाठी जिंकला आहे. डिविलियर्सच्या मते वनडे विश्वचषकात देखील विराट पुन्हा एकदा अशीच कामगिरी करू शकतो. संघाला दबावाच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी उंचावण्यासाठी त्याने विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डिविलियर्स म्हणाला, “विराटसाठी हा विश्वचषक शानदार राहणार आहे. यावर्षीच्या विश्वचषकात तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांपैकी एक असेल. त्याला पहिल्या तीन फलंदाजांमध्ये स्थान मिळेलच. 2023 विश्वचषकात विराट काही अत्यंत निर्णायक इनिंग्ज खेळणार आहे. जेव्हा भारतीय संघावर दबाव असेल, तेव्हा संघाकडे हक्काचा विराट कोहली असेल. तो संघाला मदत करेल.” दरम्यान, वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारताला आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासोबत खेळायचा आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. (According to AB de Villiers, Virat Kohli will be the highest scorer in the upcoming ODI World Cup)
विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
महत्वाच्या बातम्या –
SNBP Hockey । राऊंड ग्लास अकादमीचा २७ गोलने दणदणीत विजय, पहिल्याच दिवशी स्पर्धेत ६४ गोलांची नोंद
दरियादिल सॅमसन! वर्ल्डकप स्कॉडमध्ये वगळळ्यानंतरही खचला नाही, पाकिस्तानी अष्टपैलूसोबत खळखळून हसला






