---Advertisement---

ENG vs ENG । विराट-अँडरसन बॅटल पुन्हा पाहायला मिळणार नाही? माजी दिग्गज म्हणतोय…

Virat-Kohli-And-James-Anderson
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहली खेळणार नव्हता. पण शनिवारी (10 फेब्रुवारी) विराट मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमधून देखील बाहेर पडला. बीसीसीआयने मालिकेतील मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी शनिवारी भारतीय संघ घोषित केला, त्यात विराटचे नाव नव्हते. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने खास प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) शेवटच्या तिन्ही कसोटींमधून वैयक्तिक कारण देत बाहेर पडला आहे. चाहते आणि भारतीय संघासाठी ही नक्कीच चितेंची बाब ठरू शकतो. पण बीसीसीआयने फलंदाजाचा हा निर्णय सन्मानपूर्वक स्वीकारला आहे. असे असले तरी, चाहत्यांना विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन (James Anderson) हा संघर्ष यावेळी पाहता येणार नाही. कदाचीत ही शेवटची वेळ होती, जेव्हा हे दोन दिग्गज एकमेकांसमोर खेळले असते. जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये विराटला आतापर्यंत 710 चेंडू गोलंदाजी केली आहे. यादरम्यान भारतीय दिग्गजाने 43.6च्या सरासरीने 305 धावा केल्या. अँडरसनने आतापर्यंत सात वेळा विराटची विकेट देखील घेतली आहे.

आकाश चोप्राच्या मते विराट कशामुळे संघातून बाहेर, याचा अंदाज लावणे चुकीचे आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर तो म्हणाला, “दोन सामन्यांचं सोडा, विराट संपूर्ण कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नाहीये. कोणालाच माहीत नाहीये की विराटच्या विश्रांती मागे नक्की कारण काय आहे. आपण याचा अंदाज लावलाही नाही पाहिजे. आता आपण विराट कोहली आणि जेम्स अँडरसन यांच्यातील शेवटचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण काहीच अडचण नाही. मला वाटते नक्कीच काहीतरी मोठे कारण असेल. विराटने याआधी कधीच आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अशी मोठी मालिका सोडली नाहीये. मला लक्षात आहे की, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सोडली होती. त्यावेळी भारतीय संघ पहिल्या सामन्यात अवघ्या 36 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यावेळी तो पॅटरनिटी लीववर होता. पण त्याआधी किंवा त्यानंतर कधीच अशा प्रकारची सुट्टी त्याने घेतली नव्हती.”

इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप

इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांचे वेळापत्रक –
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल. (According to Akash Chopra, Virat and James Anderson rivalry will never be seen again)

महत्वाच्या बातम्या – 
Ind vs Aus U19 WC Final : अंडर 19 वर्ल्डकपचा षटकार लावण्यासाठी भारतापुढे 254 धावांचे लक्ष…
ओळखा पाहू! IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सच्या खेळाडूने केला 90 च्या दशकातील अनोखा लुक…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---