नुकत्याच पार पडलेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंड संघाने (england test team) सर्वांचीच निराशा केली. इंग्लंडने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असा पराभव पत्करला. या खराब प्रदर्शनानंतर अनेक दिग्गजांनी इंग्लंड संघावर टीका केली. आता इंग्लंडचे माजी कर्णधार डेविड गॉवर (david gower) यांनी स्वतःच्या संघावर निशाना साधला आहे. गॉवर यांनी आयपीएल स्पर्धेला देखील इंग्लंडच्या खराब कसोटी प्रदर्शनासाठी कारणीभूत ठरवले आहे.
ऍशेस मालिकेतील खराब प्रदर्शनानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांच्यावर प्रामुख्याने टीका केली जात आहे. अनेकांच्या मते या दोघांनी स्वतःचे पद सोडले पाहिजे. माजी कर्णधार गॉवर यांच्या मते इंग्लंडच्या मर्यादित षटकांतील कर्णधार ओएन मॉर्गनच्या नेतृत्वातील संघ कसोटी संघापेक्षा अधिक भक्कम दिसतो. तर, दुसरीकडे खेळाडू आयपीएलला जास्त महत्व देत असल्यामुळे कसोटी संघ तुलनेने कमजोर दिसतो. गॉवर म्हणाले की, खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला अधिक गांभीर्याने घेतले पाहिजे.
गॉवर म्हणाले की, “लांबुन बघणाऱ्यांसाठी हे खूप स्पष्ट आहे की, मॉर्गन मर्यादित षटकांतील संघासोबत सर्वकाही करू शकतो, जे त्याला करायचे आहे. परंतु बिचारा जो रूट स्वतःला अशा लोकांमध्ये फसला आहे, जे पूर्णपणे उपलब्ध नाहीत, कारण ते खेळाडू आयपीएलमध्ये दिसतात.”
“कसोटी हा खेळाचा सर्वात जुना व सर्वात महत्वाचा प्रकार आहे. आपल्याला त्याची सुरक्षा करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला इंग्लंडच्या एका अशा संघाची गरज आहे, जो या प्रकारात चांगल्या प्रकारे खेळेल. असा संघ जो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खालच्या क्रमांकावर नसेल” असे गॉवर पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामतील इंग्लंडचे प्रदर्शन पाहता, ते खूपच निराशाजनक राहिले आहे. चालू हंगामात इंग्लंडने खेळलेल्या ९ कसोटी सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने आयपीएल २०२२ मध्ये सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण ऍशेसमधील पराभवानंतर त्याने हा निर्णय मागे घेतला. सोबतच अष्टपैलू बेन स्टोक्स देखील पुढच्या आयपीएल हंगामात खेळताना दिसणार नाही.
महत्वाच्या बातम्या –
सलग ६० दिवस मॅरेथॉन धावण्याचा आशिष कासोदेकर यांचा जागतिक विक्रम
वनडे क्रमवारी: भारताच्या विराट कोहली, रोहित शर्माला मोठे नुकसान, पाहा कोण कितव्या स्थानावर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन
व्हिडिओ पाहा –