भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) नाव घेतलं जातं. परंतु, याबतीत अनेक चाहत्यांचं मत वेगळं आहे. तसंच इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड लाॅइडनं (David LIoyd) भारताच्या सर्वोत्तम कर्णधाराचं नाव सांगितलं आणि सर्वांना आश्चर्यचकित करुन टाकलं आहे. धोनी, रोहित, कपिल देव यांनी भारताला विश्वविजेता बनवलं आहे. पण डेव्हिड लाॅइडनं एका मुलाखतीत भारताच्या सर्वोत्तम कर्णधाराबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान लॉयडनं कपिल देव (Kapil Dev), महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार मानलं नाही परंतु त्यांच्या मते, भारताचा महान कर्णधार कोणी असेल तर तो सौरव गांगुलीशिवाय (Saurav Ganguly) दुसरा कोणी नाही.
डेव्हिड लॉइडनं ((David LIoyd)) गांगुलीला भारताचा सर्वात आक्रमक कर्णधार सांगितलं आणि म्हणाला की, “गांगुली कर्णधार बनल्यानं भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आली. गांगुलीनं विरोधी संघालाही विचार करायला भाग पाडलं. गांगुलीनं विरोधी संघाशी आक्रमकपणे खेळायला सुरुवात केली. त्यानं भारतीय क्रिकेटला बदलून टाकलं. गांगुलीनं भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली. त्यांना आज जे यश मिळत आहे त्यामागे गांगुलीची आक्रमक विचारसरणी आहे.”
पुढे बोलताना लाॅइड म्हणाला की, “तुम्ही बघा, अँड्र्यू फ्लिंटॉफनं मुंबईतील विजयानंतर त्याचा टी-शर्ट काढला होता. याचा बदला गांगुलीनं लॉर्ड्सवर घेतला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारत स्लेजिंगला प्रत्युत्तर द्यायला शिकला, ऑस्ट्रेलियाला गेल्यावर भारतीय खेळाडूंनी अशी आक्रमकता दाखवली जी कांगारुंनी भारतीय खेळाडूंमध्ये यापूर्वी पाहिली नव्हती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले. म्हणूनच मी गांगुलीला भारताचा महान कर्णधार मानतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं
भारतीय संस्कार! कांस्यपदक जिंकताच हाॅकी संघ देव दर्शनाला, पाहा सुंदर VIDEO
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये कोहली रचणार इतिहास? ‘या’ दिग्गजांना सोडणार मागे