ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे (australia team) माजी दिग्गज इयान चॅपल (Ian Chappell,) यांनी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. इयान चॅपल यांनी सांगिल्याप्रमाणे विराट कोहली (virat kohli) एक उत्कृष्ट कर्णधार आहे आणि तो संपूर्ण संघाला सोबत घेऊन पुढे गेला. तसेच इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट (joe root) विषयी देखील चॅपल बोलले. त्यांच्या मते रुट एक चांगला फलंदाज आहे, पण नेतृत्वात तो चांगली कामगिरी करू शकत नाही.
इयान चॅपल म्हणाले की, “जो रुट आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. जर विराट कोहलीविषयी बोलायचे तर, रिषभ पंतची सुधारणा एक मोठे उदाहरण आहे. विराटने विदेशातील धरतीवर ज्याप्रकारे स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला, तिथपर्यंत इतर कोणताच भारतीय कर्णधार पोहोचू शकला नव्हता.”
चॅपल म्हणाले की, “विराटने सौरव गांगुली आणि एमएस धोनीचा वारसा अगदी योग्य पद्धतीने पुढे चालवला आहे. तो मागच्या सात वर्षांपासून संघाला स्वतःच्या खांद्यावर घेऊन पुढे जात आहे. त्यांच्यामते, रिषभ पंतला एका यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात विराटकडून मिळालेले सहकार्य, ही त्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे. हाच सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक होता.”
ऍशेस २०२१-२२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर जो रुटवर अनेकांनी निशाणा साधला. रुटच्या नेतृत्वातील इंग्लंड संघ ऍशेसमधील पाच कसोटी सामन्यांपैकी एकही जिंकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने चार सामने जिंकले, तर इंग्लंडला एक सामना अनिर्णीत करता आला. अशात आता इयान चॅपल यांनी सुद्धा रुटला एक कमजोर कर्णधार म्हटले आहे.
रिषभ पंतच्या संघातीळ स्थानाचा विचार केला, तर तो आता भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे. २०२० ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याची संघातील जागा पक्की नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत पंतने पुनरागमन केले. या मालिकेत पंतने महत्वाची भूमिका पार पाडली होती आणि त्यानंतर तो भारताचा एक मोठा खेळाडू बनला. विराटने कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर आता पंतही कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.
महत्वाच्या बातम्या –
वयाच्या ३६ व्या वर्षी कार्तिकला करायचंय टीम इंडियात पुनरागमन; म्हटला, ‘मी फिनिशरची भूमिका पार पाडेल’
अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे लाईन अप निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ दिवशी भिडणार भारत
व्हिडिओ पाहा –