एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्मा आणि धोनी या दोघांनी आपल्या संघासाठी प्रत्येकी पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. असे असले तरी, धोनी आयपीएलमधून निवृत्ती कधी घेणार, हा प्रश्न कोट्यावधी चाहत्यांना मागच्या काही वर्षांपासून पडला आहे. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने आता या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
आयपीएल 2023 हंगाम एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासाठी शेवटचा असेल, असे सर्वांना वाटले होते. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने मागच्या हंगामाचे विजेतेपद देखील मिळवले. आयपीएलमधून निवृत्ती घेण्यासाठी धोनीला एवढा चांगला योयग पुन्हा येईल की नाही सांगता येणार नाही. पण धोनीने मागच्या वर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेणे टाळले. अनेकांसाठी धोनीचा हा निर्णय आश्चर्यकारक होता. कारण मागच्या दोन-तीन हंगामांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. अनेकांना असे वाटत आहे की, धोनी आयपीएल 2024 नंतर निवृत्ती घेईल. पण माजी भारतीय दिग्गज इरफान पठाण (Irfan Pathan) याच्या मते धोनी पुढेही खेलत राहील.
इरफान पठाण याला एका कार्यक्रमात एमएस धोनी याच्याविषयी प्रश्न विचारला गेला की, धोनी यावर्षी आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार आहे का? यावर इरफानने नकारार्थी उत्तरदिले. इरफान पठाण म्हणाला, “नक्कीच नाही. मी अंदाजे एका महिन्यापूर्वी धोनीला भेटलो. त्याचे केस लांब होते. तो आता केस वाढवत आहे. तो त्याच्या जुन्या वेळत परत चालला आहे. धोनी खूप फिट दिसत होता. तो 40 वर्षांचा झाला आहे आणि अजूनही फिट आहे. मला आहे आहे की तो फ्रँचायझी आणि सर्व चाहत्यांसाठी पुढेही खेळत राहील.”
इरफान पुठान पुढ मजेत असेही म्हणाला की, धोनी जर उद्या एका पायाने खेळत असला, तरी चाहते त्याला पाहाणे पसंत करतील. इरफानने या विधानासोबत हे थोटे अतिशयोक्ती होईल, असाही उल्लेख केला. दरम्यान इरफान पठाणला असेही वाटते की, धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीची साथ सोडणार नाही. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 साली खेळला गेला होता. या हंगामात धोनीला सीएसकेने खरेदी केले. तेव्हापासून धोनी या संघाचा कर्णधार आहे. 2016 मध्ये सीएसकेवर दोन वर्षांची बंदी आल्यानंतर मात्र धोनी रायजिंक पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. (According to Irfan Pathan, MS Dhoni will not play the last IPL season this year too)
महत्वाच्या बातम्या –
शोएब बशीरनंतर आता रेहान अहमदच्या विजाचा प्रॉब्लेम! पाहा राजकोट विमानतळावर फिरकीपटूला नक्की का अडवलं
बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये! आता रणजी ट्रॉफीला पर्याय नाही, ईशानसह इतर काही खेळाडूंना केल्या सुचना