कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल यंदाचे (2024) चे विजेतेपद पटकावले. वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसलसह प्रत्येक खेळाडूने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली होती. रसलने बॉल आणि बॅटने दोन्हीत चमकदार कामगिरी केली आहे. इतकेच नाही तर रसल 2014 पासून कोलकाताचा भाग आहे. पण आता अहवालात असे समोर आले आहे की, रसल आणि केकेआर यांच्यातील भागीदारी आयपीएल 2025 मध्ये संपुष्टात येऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रसलला आयपीएल 2025 साठी कायम ठेवले जाणार नाही. मात्र, अद्यापपर्यंत रसलला कायम ठेवण्यात आले नसल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आयपीएल 2024 मध्ये, रसेलने 9 डावात 31.71 च्या सरासरीने आणि 185.00 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 222 धावा केल्या. याशिवाय त्याने 14 डावात गोलंदाजी करताना 15.52 च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या.
गेल्या मोसमातील या कामगिरीनंतरही रसलला कायम ठेवले नाही. तर तो केकेआरचा धक्कादायक निर्णय असेल. आता आयपीएल 2025 पूर्वी रसलबाबत कोलकाता फ्रँचायझी काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रसेल लिलावात आल्यास त्याला चांगली किंमत मिळू शकते.
रसलने 2012 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या दोन मोसमात तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. त्यानंतर 2014 मध्ये, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला. त्यानंतर तो पुन्हा कोणत्याही संघाचा भाग झाला नाही.
रसेलने आतापर्यंत एकूण 127 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 105 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 174.92 च्या स्ट्राईक रेटने 2484 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 11 अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत 112 डावांमध्ये 115 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/15 अशी होती.
हेही वाचा-
IND VS NZ; मालिका गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये बदल करणार का?
BGT मालिकेपूर्वी संघाला धक्का! यष्टीरक्षक फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
IND VS AUS; भारताची डोकेदुखी वाढली, BGT मालिकेपूर्वी कांगारुंना मिळाला नवा सलामीवीर!