---Advertisement---

मुंबई इंडियन्सला रोहितच्या अटी मान्य, कर्णधार बदलणार?

---Advertisement---

आयपीएलच्या आगामी हंगामाच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. चाहते आगामी हंगामाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आयपीएल 2025 पूर्वी मोगा लिलाव होणार आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचे संघ बदलणार आहेत. तत्पूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्सबाबत अनेक प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट समोर आल्या आहेत. शेवटच्या हंगामात मुंबईनं रोहितला हटवून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार केलं होतं. तेव्हापासून रोहित संघ सोडणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

तत्पूर्वी सोशल मीडियावर शेअर केलल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सर्व अटी मान्य करण्यासाठी तयार आहे आणि ते हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार पदावरुन डच्चू देऊ शकतात.

सोशल मीडियावर रुशी नावाच्या युजरकर्त्यानं त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये मुंबईनं रोहितच्या सर्व अटी मान्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशा अनेक अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. याबात अद्याप स्पष्टता झाली नाही.

रुशी नावाच्या युजरकर्त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहलं की, “मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या सर्व अटी मान्य करण्यास तयार आहे आणि रोहितच्या म्हणण्यानुसार संघ बनवण्यासही तयार आहे, सूर्याला कर्णधार बनवायचे की स्वत: हा निर्णय रोहितचा असेल. रोहित, सूर्या आणि बुमराहला संघात कायम ठेवण्यासाठी एमआय कठीण प्रयत्न करेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग बातमी: मोर्ने मॉर्केलची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आश्चर्यकारक निर्णय, कसोटी सामन्यात चक्क प्रेक्षकांवरच घातली बंदी
(15 ऑगस्ट) धोनीच्या स्टाईलमध्ये क्रिकेटला अलविदा करणार भारताचे हे 3 धुरंधर?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---