यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत-न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. (India vs New Zealand Final) दरम्यान चाहते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. (9 मार्च) रोजी दुबई येथे दोन्ही संघातील फायनल सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. आता फायनल सामन्यापूर्वी अशा बातम्या येत आहेत ज्यामुळे चाहते आणखी आनंदी होऊ शकतात. ही बातमी फायनल सामन्याच्या खेळपट्टीबद्दल आहे. वास्तविक, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईतील फायनल सामना नवीन खेळपट्टीवर खेळवला जाणार नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा फायनल सामना त्याच मैदानावर खेळवला जाईल जिथे भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केले होते. (23 फेब्रुवारी) रोजी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा सामना झाला. हा सामना होऊन 2 आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. अशा परिस्थितीत, ही खेळपट्टी फायनल सामन्यासाठी वापरली जाऊ शकते.
जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल सामना या खेळपट्टीवर खेळला गेला तर भारताला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. खरं तर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवरून खूप मदत मिळाली. अशा परिस्थितीत, जर या खेळपट्टीवर विजेतेपदाचा सामना झाला, तर भारतीय फिरकी गोलंदाज पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत न्यूझीलंडला आपल्या जाळ्यात अडकवताना दिसू शकतात.
भारत-न्यूझीलंड संघाच्या वनडे क्रिकेटमधील हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 119 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले. भारताने 61 सामन्यात मिळवला, तर न्यूझीलंडने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान भारताने 50 सामने गमावले, तर न्यूझीलंडला 61 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघातील 7 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला. (India vs New Zealand Head to Head Records In ODI)
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ Final: न्यूझीलंडने दिलेल्या ‘या’ 3 जखमांचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी!
भारतीय खेळाडूची जादू! न्यूझीलंड संघाच्या रणनीतीचा केला पार भुगा
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणत्या भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर






