---Advertisement---

रोहित की विराट? माजी इंग्लिश दिग्गजाचा किंगला पाठिंबा; म्हणाला, ‘पहिल्या कसोटीत…’

Rohit Sharma Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अनेकांनी या पराभवानंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वगुणांवर शंका उपस्थित केली. अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाची कमी जाणवत आहे, असे म्हटले.

विराट कोहली (Virat Kohli) दोन वर्षापूर्वीपर्यंत भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार होता. पण जानेवारी 2022 मध्ये त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 2-1 असा पराभव मिळाल्यानंतर विराटने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या काही दिवस आधीच विराटने टी-20 आणि वनडे संघाचे कर्णधारपद देखील सोडले होते. रोहित शर्मा (Rohit Sharma) मागच्या दोन वर्षांपासून भारताचा पूर्णवेळ कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसला आहे. अनेक महत्वाच्या मालिहा भारताने या दोन वर्षांच्या काळात जिकल्या. तसेच मागच्या वर्षी भारतात जालेला वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ दावेदार होता. रोहितच्याच नेतृत्वत भारताने विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला, पण ऑस्ट्रेलियाकडून संघाला पराभव स्वीकारावा लागला.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याच्या मते इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट भारताचा कर्णधार असता, तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकत होता. “विराट कोहलीच्या नेतृत्वाची उणीव भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात भासत आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने पहिली कसोटी गमावली नसती. रोहित नक्कीच एख महान खेळाडू आहे. पण मला वाटते तो सध्या तशी कामगिरी करत नाहीये.”

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने विजय मिळवल्यानंतर 0-1 अशी आघाडीही घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होईल. या सामन्यात विराटसह केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांना खेळता येणार नाहीये. सरफराज खान याला भारताकडून कसोटी पदार्पणाची संधी मिळत आहे.  (According to Michael Vaughan, if Virat Kohli had captained India in the first Test against England…)

महत्वाच्या बातम्या – 
महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे अर्धशतक, पलक जोशीने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून जिंकले गोल्ड 
41व्या वरिष्ठ व 25व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाची आगेकूच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---