आगामी आयपीएलच्या 18व्या हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी अजून तारीख घोषित झाली नाही. पण या हंगामापूर्वी अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलताना दिसणार आहेत. प्रत्येत संघ आपल्या काही स्टार खेळाडूंना संघात कायम ठेवेल, तर इतर खेळाडू लिलावात दिसणार आहेत. तत्पूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा स्टार खेळाडू संघाची साथ सोडू शकतो.
शेवटच्या आयपीएल हंगामापासून मुंबई इंडियन्स संघात खळबळ उडाली आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, 2023च्या आयपीएल हंगामापर्यंत मुंबईचे कर्णधार असणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) आधीच संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचवेळी मधल्या फळीला मजबूत करणारा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) संघातून बाहेर पडल्याच्या बातम्या येत आहेत.
तत्पूर्वी नुकत्याच आलेल्या एका अशी बातमी समोर येत आहे की, संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आता मुंबई इंडियन्सला अलविदा म्हणू शकतो. असे झाल्यास मुंबईसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असू शकतो. बुमराह त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मुंबई फ्रँचायझीसोबत आहे आणि जर तो इतर कोणत्याही संघात गेला तर पाच वेळच्या चॅम्पियन संघाला त्याची जागा शोधणे खूप कठीण होईल.
रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स बुमराहला कायम ठेवण्यास तयार आहे, मात्र त्याने स्वतः संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावाही केला जात आहे की, बुमराह मुंबई सोडून गुजरात टायटन्स संघात सामील होऊ शकतो. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! 18 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, 498 धावांची तुफानी खेळी
काय सांगता! जास्त फॅन्स आल्यास स्टेडियमचा स्टँड कोसळेल, भारत-बांगलादेश कसोटीसाठी तिकिटांच्या विक्रीवर बंदी
शतकानंतरही इशान किशनला टीम इंडियात संधी मिळणार नाही? जाणून घ्या कारण