भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका (Border Gavaskar Trophy) खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना (22 नोव्हेंबर) पासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. पण याआधी भारताला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. खरेतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. अशा स्थितीत पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक कारणांमुळे भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. रोहित शर्मा संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भाग घेणार असल्याच्या बातम्या अलीकडेच आल्या होत्या. पण रोहितने आता संघासोबत तिथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळाडू 2 गटात ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत.
🚨 UPDATE ON ROHIT SHARMA :
“Captain Rohit Sharma is not travelling with the Indian team to Australia due to personal reasons, Rohit’s future plans, nothing has been confirmed yet.”
Hope Rohit should reach Australia before the first test 🤞🏻 pic.twitter.com/hZgNfUJ6gE
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) November 10, 2024
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क
5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचे आव्हान!
संघाला मोठा झटका, टी20 मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ अष्टपैलू खेळाडू!
बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी