सध्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्याचबरोबर पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) संघातील टी20 मालिकेला (14 नोव्हेंबर) पासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान संघातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील 17व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद हसनैनचा चेंडू ओढण्याच्या प्रयत्नात कूपर कॉनोलीच्या (Cooper Connolly) हाताला दुखापत झाली. दुसऱ्या चेंडूचा सामना केल्यावर कॉनोली मैदानावर खूप वेदनादायी दिसला. त्यानंतर फिजिओशी बोलल्यानंतर त्याने मैदान सोडले आणि त्यानंतर स्कॅन करताना त्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले.
स्कॅन केल्यानंतर, कॉनोली पर्थ स्टेडियमवर परतला आणि ऑस्ट्रेलियन डगआउटमध्ये बसलेला दिसला. पाकिस्तानने 8 विकेट्सने सामना जिंकून मालिका 2-1 ने आपल्या खिशात घातली. सामन्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कॉनोलीच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे विधान करण्यात आले. आता पाकिस्तानविरूद्धच्या टी20 मालिकेत त्याच्या जागी कोण येणार? हे लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
कूपर कॉनोलीने (Cooper Connolly) सप्टेंबरमध्ये यूके दौऱ्यावर पदार्पण केले होते. जिथे त्याने स्कॉटलंड आणि इंग्लंडविरूद्ध 2 टी20 सामने खेळले, परंतु त्याने फलंदाजी केली नाही. त्याने 5 षटके गोलंदाजी केली पण त्याला एकही विकेट मिळवण्यात यश आले नाही. युके येथे झालेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीत काॅनोली भारत अ विरूद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाकडून खेळला, जिथे त्याने पहिल्या डावात 37 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी
रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह भारतीय संघाला मिळवून देणार यश? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
चॅम्पियन्स ट्रॉफीचं प्रकरण न्यायालयात पोहोचलं! बीसीसीआयविरोधात कोर्टाचं दार ठोठावणार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड?