भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 ची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाने केली. भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर अक्षरश नाचवलं. परंतु भारताने सलामीचे फलंदाज स्वस्तात गमावले, तरीही भारताने जबरदस्त पुनरागमन करत विजय खेचून आणला. अशातच भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरने एका भारतीय फलंदाजाला निवडलं आहे. जो शेवटच्या क्षणापर्यंत हार मानत नाही.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतत्वाखालील भारतीय संघ विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा दावेदार मानला जात आहे. विश्वचषक चालू होण्याअगोदर भारतीय संघाने आशिया चषक जिंकला आहे. त्यानंतर विश्वचषक 2023 च्या पहील्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवलं. विश्वचषक संघात शेवटच्या क्षणी संधी मिळालेल्या आर अश्विनबद्दल सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने एक मोठं वक्तव्य केलं आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर अश्विनला संघात संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात अश्विनने 1 विकेट घेतली. सचिनच्या मते अश्विनकडे खूप विश्वास आहे.
सचिन तेंडूलकर एका यू-ट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “अश्विन खूप अनुभवी खेळाडू आहे. तो एक लढवय्या आहे आणि शेवटच्या क्षणापर्यांत लढायचं त्याला माहीत आहे. मी त्याला चांगलं ओळखतो. तो कधीही सामन्यातून बाहेर नसतो. त्याचा सामन्याबद्दलचा अप्रोच खूप जबरदस्त आहे. मी एक गोलंदाज आणि फलंदाज म्हणून त्याला पसंत करतो.”
दरम्यान, वनडे विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ घोषित होण्याआधी अश्विनचे संघातील स्थान निश्चित मानले जात नव्हते. आशिया चषकासाठीही त्याला संघात घेतले गेले नव्हते. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून अश्विनने संघात जोरदार कमबॅक केले आणि पुढे विश्वचषक संघात देखील स्थान मिळवले. विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतली होती. (According to Sachin Tendulkar, Ravichandran Ashwin is India’s fighting player)
महत्वाच्या बातम्या –
हार्दिक पंड्यासाठी आजचा दिवस ठरला अविस्मरणीय, ४० हजार प्रेक्षकांसमोर…
INDvAFG: शाहिदी-ओमरझाईने केला संघर्ष! टीम इंडियासमोर 273 चे लक्ष, जस्सीचे चार बळी