पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने १५ वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. अख्तरवर २००५मध्ये एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
हॅलो ऍपला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अख्तर म्हणाला, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान माझ्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. तरी, खरी गोष्टी अशी आहे, की ते कृत्य पाकिस्तान संघाच्या इतर खेळाडूने केले होती, ज्याचे एका मुलीशी भांडण झाले होते. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने त्या खेळाडूचे कृत्य लपवून ठेवले. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) म्हटले, की त्या खेळाडूचे नाव उघडकीस करू नका. परंतु केवळ एवढे सांगा, ते कृत्य करणारा व्यक्ती शोएब अख्तर म्हणजेच मी नाही. जेव्हा ती घटना घडली होती, तेव्हा सर्व लोक माझ्यावर संशय घेत होते.”
“मी पीसीबीला म्हटले, की माझं काहीही देणं- घेणं नाही. त्यावेळी पीसीबीने मला म्हटले की तू खूप पार्टी करतो. परंतु ते कृत्य इतर कोणीतरी केले होते. पीसीबीने आजपर्यंत मी निर्दोष असल्याचे सांगितले नाही. माझे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. आज मी पहिल्यांदा जगासमोर याविषयी बोलत आहे. ते कृत्य संघातील अशा खेळाडूने केले होते, ज्याला संघातील सर्वात सभ्य व्यक्ती म्हटले जात होते,” असे अख्तर पुढे म्हणाला.
त्या घटनेनंतर २००५मध्ये अख्तरला दौऱ्याच्या मधूनच पाकिस्तानला बोलावण्यात आले होते. त्यामुळे तर सर्वांना अख्तरवर संशय आला होता.
अख्तरने पुढे सांगितले, की २०००मध्ये त्याच्याच संघातील ६ अनुभवी खेळाडू त्याला मारण्यासाठी आले होते.
अख्तरने दिलेल्या माहितीनुसार, “त्यामधील एक खेळाडू दिग्गज सलामीवीर फलंदाज होता. तो इतर ५ खेळाडूंबरोबर मला बॅटने मारण्यासाठी आला होता. मी मीडिया आणि मुलींमध्ये प्रसिद्ध होतो. त्यांना याच गोष्टीची समस्या असल्यामुळे ते मला मारण्यासाठी आले होते. मला ड्रेसिंग रूममध्ये खूप काही सहन करावे लागले होते.”
बकिंगहॅम पॅलेसमध्ये सक्लेन मुश्ताकचा (Saqlain Mushtaq) गळा पकडला होता. तसेच, मोहम्मद युसूफबरोबरही भांडण झाल्याचे अख्तरने सांगितले.