पर्थनंतर (Perth) गाबा (Gabba) येथेही इंग्लंडला (England) मान खाली घालावी लागली. ऍशेस (Ashes) मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लिश संघाने पुन्हा एकदा कांगारूंपुढे (Kangaroos/Australians) गुडघे टेकले. गाबा येथील विजयासह ऑस्ट्रेलियाने (Australia) मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. कांगारूंच्या भूमीवर इंग्लंडसाठी पराभवाची मालिका संपायचे नाव घेत नाहीये.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या 17 कसोटी सामन्यांमध्ये एकही विजय मिळवलेला नाही. या 17 पैकी 15 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर दोन सामने टीम कशाबशा ड्रॉ करण्यात यशस्वी झाली आहे. गाबा येथे इंग्लंडचे फलंदाज चालले नाहीत आणि गोलंदाजही काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. दुसऱ्या डावात 241धावांवर सर्वबाद झाल्यानंतर इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 65 धावांचे लक्ष्य ठेवले, जे कांगारूंनी अवघ्या 10 षटकांत हसत-खेळत पूर्ण केले.






