ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. दोघांच्या नाबाद 251 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलिया सामन्यात पुढे पोहोचला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतरही या सामन्यात पुढे होण्याची संधी गमावल्यानंतर, भारतीय चाहते भारतीय संघावर टीका करत आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला बळी लवकर मिळवूनही भारतीय संघाला आक्रमण करता आले नाही. डेव्हिड वॉर्नर व मार्नस लॅब्युशेनने दुसऱ्या गड्यासाठी केल्यानंतर चौथ्या गड्यासाठी स्मिथ व हेड यांनी 251 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 327 अशा मजबूत स्थितीत पोहोचला होता.
या संपूर्ण दिवसात भारतीय संघाचे खांदे अखेरच्या सत्रात पडलेले दिसले. यामुळेच भारतीय संघाच्या ऊर्जा विषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा अभिनेता हर्षवर्धन कपूर याने ट्विट करत हाच मुद्दा उचलला. त्याने लिहिले
“विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार नसणे दुःखद आहे. तो त्या ठिकाणी नसल्याने खेळाडूंमध्ये ऊर्जा व विजयाची भूक दिसून येत नाही. रोहितच्या नेतृत्वात हे खेळाडू केवळ परिस्थिती सोबत वाहवत जात आहेत. खराब संघनिवड, अश्विनला स्थान नाही आणि बुमराह नसणे मोठी कमजोरी ठरली.”
विराट कोहली याचा नेतृत्वात भारतीय संघाने मागील वेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी भारताला पराभूत व्हावे लागलेले.
(Actor Harshvardhan Kapoor Take Dig On Rohit Sharma Captaincy And Said Without Virat No Team Energetic)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट