जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाज म्हणून गौरवण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हादेखील त्याच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. अर्जुनने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना आयपीएल 2023च्या 25व्या सामन्यात आपली क्षमता सिद्ध केली आणि आयपीएल कारकीर्दीतील पहिली विकेट नावावर केली. अर्जुनने सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू भुवनेश्वर कुमार याला पदार्पणाचा शिकार बनवले. यानंतर पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा हिचे ट्वीटदेखील व्हायरल झाले.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल 2023 स्पर्धेतील पाचवा सामना खेळला. तर, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने त्याचा दुसरा सामना खेळला. त्याने त्याचा दुसरा सामना यादगार बनवला. खरं तर, अर्जुनने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. मात्र, त्या सामन्यात त्याला विकेट घेता आली नव्हती.
अर्जुनला मिळाली मोठी जबाबदारी
अर्जुन तेंडुलकर याने मंगळवारी (दि. 18 एप्रिल) हैदराबादविरुद्ध पहिल्या दोन षटकात फक्त 14 धावा खर्च केल्या. यानंतर त्याच्यावर डावातील अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. हैदराबादला विजयासाठी अखेरच्या षटकात 20 धावांची गरज होती. मात्र, अर्जुनने फक्त 6 धावा खर्च केल्या. तसेच, भुवनेश्वर कुमार याच्या रूपात पहिली विकेटही घेतली. अशाप्रकारे मुंबईने 14 धावांनी सामना खिशात घालत विजयाची हॅट्रिक घेतली.
तेंडुलकर कुटुंबही खुश
भुवनेश्वर कुमार हा हैदराबादचा बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने कव्हर्समध्ये भुवनेश्वरचा झेल घेतला. अर्जुनने पहिल्या विकेटचा जल्लोष संघसहकाऱ्यांसोबत केला. मैदानात उपस्थित वडील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांनीही 23 वर्षीय अर्जुनच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला.
प्रीती झिंटाचे ट्वीट व्हायरल
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर प्रीती झिंटा (Preity Zinta) हिने अर्जुन तेंडुलकर याची प्रशंसा करणारे ट्वीट केले. हे ट्वीट सर्वत्र व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये प्रीतीने लिहिले की, “अनेक लोकांनी नेपोटिझमच्या नावावर त्याची खिल्ली उडवली. मात्र, आज त्याने दाखवून दिले की, त्याने त्याची जागा चांगल्याप्रकारे कमावली आहे. शुभेच्छा अर्जुन. सचिन तुम्हालाही खूप अभिमान वाटत असेल.”
Many mocked him for nepotism but tonight he has shown his spot is well earned 👏 Congrats Arjun. @sachin_rt you must be so proud #Arjuntendulkar #SRHvsMI #TATAIPL2023
— Preity G Zinta (@realpreityzinta) April 18, 2023
अर्जुनने मोडला वडिलांचाच विक्रम
आयपीएलमध्ये पहिली विकेट घेताच अर्जुन तेंडुलकर याने वडील सचिनचाही विक्रम मोडीत काढला. सचिनने आयपीएलमध्ये एकही विकेट घेतली नाही. त्यामुळे अर्जुन आयपीएलमध्ये विकेट घेणारा कुटुंबातील पहिलाच सदस्य बनला. (actress and punjab kings owner preity zinta tweet after arjun tendulkar takes his 1st ipl wicket read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPLमध्ये लेकाला खेळताना पाहून सचिनच्या डोळ्यात तरळले अश्रू, अर्जुनची पहिली ओव्हर का आहे खास?
धक्कादायक! सिराजकडे संघाची अंतर्गत माहिती मागत होता ड्रायव्हर, पैशाचे आमिष दाखवताच उचलले मोठे पाऊल