भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या भेदक गोलंदाजीने धमाल करत आहे. तो या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. शमीने आतापर्यंत विश्वचषक 2023 स्पर्धेत फक्त 4 सामने खेळले आहेत. त्यात त्याने उच्चकोटीची गोलंदाजी करत 16 विकेट्स घेतल्या आहेत. शमीने वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंकेविरुद्ध 18 धावा खर्चून घेतलेल्या 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे. त्यानंतर संपूर्ण विश्वच त्याच्यावर फिदा झाले. यामध्ये एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीने शमीला थेट लग्नाची मागणी घातली आहे.
काय आहे प्रकरण?
मोहम्मद शमी विश्वचषक 2023 (Mohammed Shami World Cup 2023) स्पर्धेतील शानदार प्रदर्शनामुळे चर्चेत आहेच, पण आता तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. खरं तर, अभिनेत्री पायल घोष हिने शमीला लग्नासाठी प्रपोज (Payal Ghosh Proposes Mohammed Shami) केले आहे. पायल घोष (Payal Ghosh) नेमहीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला संपूर्ण जगापुढे लग्नासाठी प्रपोज केले आहे. मात्र, यावेळी तिने एक अटही ठेवली आहे.
अभिनेत्रीने तिच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिले की, “शमी तू तुझी इंग्रजी सुधार, मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे.”
#Shami Tum apna English sudharlo, I’m ready to marry you 🤣🤣
— Paayel Ghoshॐ #modi’s family ..modiji my Father 😇 (@iampayalghosh) November 2, 2023
शमीने दिली नाही प्रतिक्रिया
अभिनेत्रीचे ट्वीट इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाले आहे. तसेच, नेटकरी पायलबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत. असे असले, तरीही शमीने अद्याप या प्रपोजलवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये आणि आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, तो आगामी काळात यावर कोणती प्रतिक्रिया देतो की नाही.
कोण आहे पायल घोष?
पायल घोष हिचा जन्म कोलकाता येथे 1992 मध्ये झाला आहे. तिने आपले शिक्षण सेंट पॉल मिशन स्कूलमधून केले आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समधून पदवीचे शिक्षण घेतले. तिने अभिनयात कारकीर्द घडवण्यासाठी कॉलेजमध्ये असतानाच घरून पळून मुंबईत आली होती. त्यानंतर तिची अभिनय कारकीर्द सुरू झाली. (actress payal ghosh proposed indian cricketer mohammed shami for marriage with this condition)
हेही वाचा-
अरे व्वा! भारताच्या ‘या’ 2 शहरांमध्ये होऊ शकते WPL 2024चे आयोजन, तुमच्या तर शहरात नाही? वाचा लगेच
बिग ब्रेकिंग! दिग्गज कॅप्टनने तडकाफडकी केली निवृत्तीची घोषणा, अचानक घेतलेल्या निर्णयाने क्रिकेटविश्वाला धक्का