जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती, शुबमन गिल याला बाद दिलेल्या वादग्रस्त निर्णयाची. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीर शुबमनचा झेल चर्चेचा विषय बनला आहे. त्याला स्कॉट बोलँड याने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कॅमरून ग्रीन याच्या हातून शुबमनला झेलबाद केले. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये हा झेल स्पष्ट दिसत नव्हता. यावर तिसऱ्या पंचांनी शुबमनला झेलबाद दिले. या निर्णयावर चाहत्यांपासून ते दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी टीका केली होती. तसेच, रोहित शर्मा यानेही नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. श्रद्धानेही पंचांवर निशाणा साधला आहे.
श्रद्धा कपूरने पंचांना केले ट्रोल
अभिनेत्री श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) हिने तिसऱ्या पंचांना वेगळ्याच पद्धतीने ट्रोल केले आहे. तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात तिच्या हातात बदाम दिसत आहे. या स्टोरीसोबतच श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी हे तिसऱ्या पंचांना ऑफर करत आहे.” खरं तर, स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. श्रद्धाने या पोस्टमधून पंचांची खिल्ली उडवली आहे.
Shraddha Kapoor making fun of third umpire on Shubman Gill ‘s decision.#INDvAUS #WTCFinals pic.twitter.com/psdevLbLeL
— Akshat (@AkshatOM10) June 11, 2023
खरं तर, शुबमन गिल (Shubman Gill) याला बाद दिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनेही जोरदार टीकास्त्र डागले. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, “शुबमन गिलच्या झेलाचा निर्णय लवकर घेण्यात आला. मला वाटते की, या झेलासाठी वेळ घेतला पाहिजे होता. वेगवेगळ्या अँगलने पाहायला पाहिजे होते. या निर्णयाने निराशा झाली.” तो असेही म्हणाला की, “हा अंतिम सामना आहे, अशात जोपर्यंत 100 टक्के खात्री नसते, तेव्हा निर्णय घेतला गेला नाही पाहिजे.”
रोहित शर्मा याने यावेळी आयपीएलचे उदाहरण देत म्हटले होते की, “आमच्याकडे 10 वेगवेगळे अँगल आहेत. मात्र, आयसीसीकडे इतक्या मोठ्या स्पर्धेत अशी सुविधा नाहीये. इथे अल्ट्रा मोशनही नाहीये आणि झूमचीही सुविधा नाहीये.” अशाप्रकारे रोहितने गिलला बाद देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
शुबमन गिल हा अंतिम सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही. त्याने पहिल्या डावात 13 धावा, तर दुसऱ्या डावात फक्त 18 धावा करत तंबूचा रस्ता धरला होता. (actress shraddha kapoor trolls umpire over shubman gill out decision in wtc final 2023)
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, एका क्लिकवर वाचा सर्व माहिती
विराटच्या कॅप्टन्सी वादावर स्पष्टच बोलला गांगुली; म्हणाला, ‘बीसीसीआयने काढलंच नव्हतं, त्याने स्वत:च…’