प्रसिद्ध फूटबाॅलपटू क्रिस्तियानोने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत हा कारनामा केला.
भारतीय प्रमाणवेळेनुसार आज ११ वाजून ४० मिनीटांनी त्याचे फाॅलोवर्स हे सेलेना गोमेझपेक्षा जास्त झाले. सध्या क्रिस्तियानोचे फाॅलोवर्स १४४,३३८,६५० असुन गोमेझचे १४४,३२१,०२९ आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर एरिआना ग्रॅंड असून तिचे फाॅलोवर्स १३ कोटीपेक्षा जास्त आहे.
इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेल्या सेलिब्रेटीमध्ये पहिल्या ५०मध्ये एकही भारतीय नाही. भारतीयांमध्ये विराट कोहलीचे २.५ कोटी तर सचिनचे १.१७ कोटी फाॅलोवर्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–चौथ्या वनडेत भारताचा विंडीजवर २२४ धावांनी शानदार विजय
–ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा