पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल संघाने सीपीसीएल संघाचा 23-15 तर एमआरपीएल संघाने ईआयएल संघाचा 30-12 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबीन फेरीत सामन्याच्या पहिल्या सत्रात बीपीसीएल व सीपीसीएल या दोन्ही संघांनी एकमेकांची ताकद आजमावत सावध व संथ खेळ करत असतानाही भक्कम आघाडी मिळवत मध्यंतरापुर्वी 16-6 अशी आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर बीपीसीएल संघाच्या काशिलिंग अडके व महेंद्र राऊत यांनी त्यांच्या लौकीकाला साजेल अशा चढाया करत संघांच्या गुणांमध्ये झपाट्याने वाढ केली. सीपीसीएल संघाच्या पेरा रसन व दयालन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
बीपीसीएल संघाच्या संघाच्या विशाल मानेने उत्कृष्ट पकडी करत सीपीसीएल संघाचा 23-15 असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या सामन्यात बीपीसीएलचा रिषांक देवडीगा दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळू शकला नाही.
दुस-या लढतीत एमआरपीएल संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा राखत इआयएल संघाचा 30-12 असा एकतर्फी पराभव करत सहज विजय मिळवला. मध्यंतरापुर्वी एमआरपीएल संघाने 15-4 अशी भक्कम आघाडी मिळवली. स्टिव्हन व दिपक यांनी आक्रमक चढाया करत संघाला 30-12 असा सहज विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबीन फेरी
बीपीसीएल वि.वि सीपीसीएल-23-15(16-6 मध्यांतरापुर्वी)
एमआरपीएल वि.वि ईआयएल– 30-12(15-4 मध्यांतरापुर्वी)