परवा बरोबर ९ वर्ष झाली जेव्हा ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला पराभूत करून 2007 चा विश्वचषक जिंकला होता. हा सामना त्यांनी डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 53 धावांनी जिंकला होता.
यावेळी ऑस्ट्रेलियाचा महान विकेटकीपर आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सगळ्यात जास्त धावा केल्या होत्या. त्याने 104 चेंडूत विक्रमी 149 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे यावेळी त्याच्या उजव्या हाताच्या ग्लोव्हजमध्ये स्क्वॅशचा चेंडू होता. याचा उपयोग त्याला बॅटवरील पकड मजबूत करण्यासाठी जाला होता, असे गिलख्रिस्ट म्हणाला होता.
या धावा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील सर्वाधिक धावा ठरल्या. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तेव्हा गिलख्रिस्टला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
याआधी असा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगने केला होता. त्याने 2003च्या विश्वचषकात नाबाद 140 धावा केल्या होत्या.
यानंतर मात्र श्रीलंकेच्या संघाने त्याच्यावर खेळाविषयी असलेल्या भावनेचा आणि पंरपरेचा अनादर केला असे आरोप लावले होते.
मात्र एमसीसीने ( मेलबर्न क्रिकेट क्लब) हे आरोप फेटाळले. एमसीसीने असे सांगितले की, गिलख्रिस्टने खेळांच्या किंवा क्रीडाप्रकाराविरूद्ध अशी कोणतीही कृती केलेली नव्हती. कारण अशा स्वरूपाच्या कोणत्याच मर्यादा तेव्हा नव्हत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–आज चुकीला माफी नाही, पराभूत संघासाठी पुढचा प्रवास खडतर
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद
–धोनीचा हा विक्रम फक्त विराटच मोडू शकतो!
–मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल
–म्हणून किदांबी श्रीकांतला सनरायर्जस हैद्राबादच्या चाहत्यांनी ट्रोल केले