अलीकडेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला जिथे दोघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली होती. त्या मालिकेत कांगारू संघाने पाकिस्तानचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. मालिका संपल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट याचे एक विधान खूप चर्चेत होते, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानचे आशियातील सर्वात वाईट संघ म्हणून वर्णन केले होते.आता गिलख्रिस्टने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना आपण पाकिस्तानसाठी असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे.
ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत आव्हान दिल्याबद्दल पाकिस्तान संघाचे कौतुक केले. गुरुवारी (11 जानेवारी) गिलख्रिस्टने खोट्या विधानाचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये लिहिले आहे, “ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मी पाहिलेला हा सर्वात वाईट आशियाई संघ आहे. गेल्या ३५ वर्षांत पाकिस्तानने इथे काय जिंकले?”
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानी लिहिले की, “अशी खोटी विधाने काही फेक अकाउंटवरून पोस्ट केली जात आहेत. हे मी कधीच बोललो नाही. माझ्या मते, पाकिस्तानने या मालिकेत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध अप्रतिम, लढाऊ कामगिरी केली आणि त्यांना काही कसोटी जिंकता आल्या असत्या.” (adam gilchrist denies calling pakistan worst asian team says never said this)
View this post on Instagram
गिलख्रिस्ट त्या कसोटी मालिकेत समालोचक म्हणून सामील होता आणि सिडनी कसोटीच्या तिसर्या दिवसानंतर त्याने पाकिस्तान संघावर बरीच टीका केल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.
या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. शान मसूद (Shan Masood) याच्या नेतृत्वाखालील संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात फ्लॉप ठरला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शेवटची कसोटी 1995-96 मध्ये जिंकली होती. (I never said that Gilchrist’s U-turn on calling Pakistan worst Asian team)
हेही वाचा
भारताला रडवणाऱ्या फलंदाजाने टेनिसच्या मैदानावर दिली जोकोविचला टक्कर, पाहा व्हायरल व्हिडीओ
रोहित आणि गिलमध्ये LIVE सामन्यात राडा, विजयानंतर कर्णधाराने जिंकले मन; म्हणाला, ‘माझी एवढीच इच्छा होती की….’