कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात गोलंदाजांचे मुख्य कर्तव्य फलंदाजाची विकेट घेणे असते. क्रिकेट कारकीर्दीत, सर्व गोलंदाज आपण घेतलेल्या विकेट्सपैकी काही खास विकेट्स अभिमानाने सांगतात, ज्या ते त्यांच्या आयुष्यात विसरू शकत नाहीत. पण जर एखादा क्रिकेटपटू जो प्रामुख्याने यष्टीरक्षक असूनही गोलंदाजी करताना विकेट घेतो, तेव्हा ती विकेट त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरते.
असाच अविस्मरणीय क्षण जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी गणल्या गेलेल्या ऍडम गिलख्रिसच्या आयुष्यात आयपीएलदम्यान आला होता. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केवळ एक विकेट घेतली आणि तीदेखील कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूवर.
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात धरमशाला येथे १ मे २०१३ रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएलमधील सामन्यात त्याने हा कारनामा केला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी ५१ धावा हव्या होत्या. हे लक्ष अशक्यप्राय होते.
तेव्हा कारकिर्दीत प्रथमच गोलंदाजीसाठी आलेल्या गिलख्रिस्टने त्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हरभजन सिंगला बाद केले. हरभजनचा झेल गुरकिरत सिंग मनने घेतला होता. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणारा धवल कुलकर्णी जखमी असल्याने तो डाव हरभजनच्या विकेटने संपला आणि पंजाबने ५० धावांनी विजय मिळवला.
उभ्या क्रिकेट कारकिर्दीत गिलख्रिस्टने कधीही कसोटी, वनडे किंवा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात एकदाही गोलंदाजी केली नाही. अगदी प्रथम श्रेणी सामन्यांतही त्याने गोलंदाजी केली नाही. अ दर्जाच्या सामन्यात त्याने केवळ १२ चेंडू व आयपीएलमध्ये १ असे केवळ १३ चेंडू त्याने गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन
आयपीएल अपडेट | आरसीबीच्या ताफ्यात नव्या शिलेदाराची एन्ट्री, टी२०त खोऱ्याने ओढतो धावा
चेन्नईची IPL इतिहासातील खराब सुरूवात, सलग तिसरा सामना गमावला; पंजाब ५४ धावांनी विजयी