---Advertisement---

धोनी बनण्याचा प्रयत्न करु नको, या दिग्गजाने दिला रिषभ पंतला सल्ला

On: बुधवार, नोव्हेंबर 6, 2019 2:09 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलक्रिस्टने (Adam Gilchrist) भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) मौल्यवान सल्ला दिला आहे. पंतने एमएस धोनीसारखे (MS Dhoni) बनण्याचा प्रयत्न करू नये, त्याने रिषभ पंत म्हणूनच ओळख निर्माण करावी, असे गिलक्रिस्टने म्हटले आहे.

“मी कोणत्याही खेळाडूंची तुलना करण्यात विश्वास ठेवत नाही. मला असं वाटतं की, भारतीय चाहत्यांनी पंतची तुलना एमएस धोनीबरोबर करणे टाळावे. धोनीने आपली प्रतिमा अगोदरच मोठी केली आहे. तिथपर्यंत एकदिवस कोणीतरी पोहचेल पण कदाचित हे संभव नाही“, असे वक्तव्य गिलक्रिस्ट एका कार्यक्रमादरम्यान यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

“रिषभ पंत हा एक प्रतिभाशाली युवा फलंदाज आहे. त्याच्यावर इतक्या लवकर एवढा दबाव टाकू नये आणि त्याने प्रत्येक सामन्यात धोनीसारखी कामगिरी करावी अशी अपेक्षाही करायला नको,” असेही पुढे गिलक्रिस्ट म्हणाला.

“मी रिषभ पंतला सल्ला देईल की तुला जितकं जमेल तितकं तू धोनीकडून शिकून घे. पण त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नको. तूला जमेल तेवढा सर्वोत्तम रिषभ पंत म्हणून ओळख बनवं,” असा मोलाचा सल्लाही गिलक्रिस्टने पंतला दिला.

धोनीने मागील अनेक वर्षांपासून यष्टीरक्षणातील उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतू आता त्याचा वारसदार म्हणून भारतीय संघात स्थान मिळवलेल्या युवा यष्टीरक्षक पंतला मागील काही दिवसांमध्ये यष्टीरक्षणाबद्दल आणि रिव्ह्यू घेण्याच्या निर्णयाबद्दल मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे.

रविवारी (3 नोव्हेंबर) दिल्लीत भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात पहिला टी20 सामना (T20 Match) पार पडला. या सामन्यात पंतने कर्णधार रोहित शर्माला रिव्ह्यू घ्यायला सांगितला होता. परंतु, तो रिव्ह्यू चूकीचा ठरला. त्यामुळेही या सामन्यानंतर चाहत्यांनी त्याची धोनीशी तुलना करत त्याच्यावर टीका केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---