न्यूझीलंड क्रिकेट संघाने 2023-24 हंगामासाठी आपला केंद्रीय करार जाहीर केला. मात्र, या करारात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. विशेष बाब म्हणजे पाच वर्षांनंतर अॅडम मिल्नेला प्रथमच केंद्रीय कंत्राट देण्यात आले आहे. आता सर्व खेळाडूंना करारावर स्वाक्षरी करण्यासाठी किंवा तो नाकारण्यासाठी 12 जूनपर्यंत मुदत देण्यात आली.
क्रिकेटमधील अॅडम मिल्नेची जबरदस्त कारकिर्द
अॅडम मिल्नेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International cricket) अलीकडची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने किवी संघासाठी एकूण 16 सामने खेळले, ज्यात 11 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि पाच एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. यादरम्यान त्याने 24 विकेट घेतल्या. तसेच, या वर्षी एप्रिलमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने अवघ्या 26 धावांत 5 बळी घेतले होते. याशिवाय त्याने न्यूझीलंडकडून शेवटचे दोन टी-20 विश्वचषकही (T20 World Cup) खेळले आहेत. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या मते, अॅडम मिल्ने गेल्या काही मालिकेतील कामगिरीमुळे केंद्रीय करारास पात्र आहे.
फिरकीपटू एजाज पटेलचे नाव यादीतुन वगळले
व्यवस्थापनाने फिन ऍलन, मार्क चॅपमन आणि ब्लेअर टिकनर यांना कायम ठेवले आहे. या तिघांनी ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम आणि मार्टन गुप्टिलची जागा घेतली. आश्चर्यकारक बाब म्हणजे डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलचे करार यादीत नाव नाही. गेल्या वर्षी, तो कराराचा भाग होता परंतु संघासाठी फक्त दोन कसोटी सामने खेळू शकला. कदाचित याच कारणामुळे त्याचा करार यादीत समावेश झाला नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे.
न्यूझीलंडच्या केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत
फिन ऍलन, टॉम ब्लंडेल, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, अॅडम मिल्ने, डॅरेल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, बी. , नील वॅगनर, केन विल्यमसन आणि विल यंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट