गुरुवारी(6 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 10 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध विंडीज संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाने अपशब्द वापरल्याने आयसीसीने त्याला ताकिद दिली आहे.
त्याच्याबद्दल आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ऍडम झम्पाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विंडिज संघात झालेल्या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेमधील लेवल 1 चे उल्लंघन केल्याने ताकिद दिली जात आहे.’
झम्पाला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसीच्या आचार संहितेतील कलम 2.3 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यात अपशब्द वापरण्याबाबत आहे. त्यामुळे त्याला आयसीसीने ताकिद देण्याबरोबरच 1 डिमिरिट पॉइंटही दिला आहे.
झम्पाने विंडीज फलंदाजी करत असताना 29 व्या षटकात अपशब्दांचा वापर केला होता. त्याचे हे अपशब्द पंचांनी ऐकले होते.
झम्पाने आपली चूक मान्य केली असून सामनाधिकारी जे क्रो यांनी केलेल्या कारवाईचा स्विकार केला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीचे सिक्रेट ऑस्ट्रेलिया संघाला सांगण्यास या दिग्गज खेळाडूने दिला नकार






