भारतीय क्रिकेट संघ असो अथवा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात आक्रमक कर्णधार मानला जातो. पण ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झांपाने अलीकडेच विराट कोहलीच्या दोन्ही बाजू मैदानाच्या बाहेरील आणि मैदानावरील या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अॅडम झांपा अनप्लेएबल पॉडकास्टमध्ये म्हणाला, “कोहली मैदाना बाहेर पूर्णपणे वेगळा आहे. तो मैदानात त्याचा आक्रमकपणा दाखवतो पण तो मैदानाबाहेर सर्वापेक्षा शांत आहे. आपण नेहमी त्याच्या विरुद्ध खेळतो तेव्हा आपल्याला समजते की मैदानात त्याला काय आवडते. मग तुम्ही जेव्हा त्याच्याबरोबर मैदानाबाहेर वेळ घालवाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो किती चांगला माणूस आहे.”
अॅडम झांपा म्हणाला, विराट कोहली मैदानातील एक अतिशय उदार व्यक्ती आहे. अर्थात तो खूप स्पर्धात्मकही आहे.
तसेच झांपा पुढे म्हणाला,” विराट कोहलीचे २ व्हर्जन आहेत. त्याच्याकडे अपेक्षांचे ओझे असते म्हणून त्याला चांगले प्रदर्शन करायचे असते. पण जेव्हा तो मैदानाबाहेर असतो, तेव्हा तो एकदम मस्त आणि शांत असतो.”
तसेच झांपा म्हणाला, “विराट त्या व्यक्तींपैकी आहे, जे खूपच हसतात. आपण जागतील सर्वात वाईट जोक सांगितला तरी तो हसेल. यावेळी मी त्याला खूप हसवले आहे.”
कोहली आणि झांपा हे दोघेही बेंगलोर संघातीव साथीदार आहेत, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ते दोघेही एकमेकां विरोधात खेळणार आहेत. तसेच झांपा हा विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करणारा गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट कसोटी मालिकेत नसणे हे निराशाजनक, परंतु तरीही भारताकडे सुपरस्टार्स आहेत”
संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
एबी डिविलियर्सने केले मुंबई इंडियन्सचे खास कौतुक, वाचा काय म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय






