---Advertisement---

IND vs AFG: पदार्पण कसोटीत या खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी! 25 वर्षांनंतर पहिल्या षटकात विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज

On: रविवार, जून 7, 2026 8:18 PM
---Advertisement---

न्यू चंदीगडच्या मुल्लांपुर स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 564 धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला, तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा अफगाणिस्तानने 113 धावांत 5 विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे पदार्पण करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार (Manav Suthar). ज्याने 15.5 षटकांत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेऊन एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला.

वरिष्ठ अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) विश्रांती देण्यात आल्याने, प्लेइंग इलेव्हनमध्ये मानव सुथारला संधी मिळाली. सुरुवातीला त्याने फलंदाजी करताना 41 चेंडूत 28 धावा केल्या आणि नंतर गोलंदाजीत कमाल केली. मानव सुथारने डावाच्या सहाव्या षटकात गोलंदाजीला सुरुवात केली आणि चौथ्याच चेंडूवर अफगाणिस्तानचा सलामीवीर अब्दुल मलिकला 16 धावांवर बाद केले. या कामगिरीमुळे तो कसोटी पदार्पणातील पहिल्याच षटकात विकेट घेणारा 8 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच, तब्बल 25 वर्षांनंतर असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

कसोटी पदार्पणात पहिल्या षटकात विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

मोंटू बॅनर्जी: विरुद्ध वेस्ट इंडीज (1948)
मनोहर हार्दिकर: विरुद्ध वेस्ट इंडीज (1958)
वामन कुमार: विरुद्ध पाकिस्तान (1961)
चेतन शर्मा: विरुद्ध पाकिस्तान (1984)
डब्ल्यू. व्ही. रमन: विरुद्ध वेस्ट इंडीज (1988)
मानव सुथार: विरुद्ध अफगाणिस्तान (2026)

मुल्लांपुर कसोटी सामन्यात भारतीय संघाला 564 धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and KL Rahul) आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळींशिवाय साई सुदर्शन, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकी खेळींनीही महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने पहिल्या डावात 126 धावा केल्या, तर राहुलने 100 धावांची खेळी केली. सुदर्शन आणि पंत यांनी प्रत्येकी 81 धावांचे योगदान दिले, तर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 52 धावांची खेळी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---