ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. गतविजेत्या ॲडलेड स्ट्रायकर्सने डब्ल्यूबीबीएल (WBBL) 2024 साठी स्मृती मंधानाला साइन केले आहे. आता टीम इंडियाी स्टार फलंदाज पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन टी20 लीगमध्ये आपली जादू दाखवताना दिसणार आहे. स्मृतीचा हा स्पर्धेतील चौथा संघ असेल. याआधी ती तीन वेगवेगळ्या संघांकडून खेळली आहे.
स्मृती मंधाना या स्पर्धेत एका संघाकडून नियमितपणे खेळली नसून ती वेगवेगळ्या संघांसाठी तीन हंगाम खेळली आहे. 2016-17 च्या मोसमात तिने ब्रिस्बेन हीटकडून या लीगमध्ये पदार्पण केले. यानंतर, ती 2018-19 सीझनमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि 2021-22 सीझनमध्ये सिडनी थंडरकडून खेळताना दिसली. तर 2022 आणि 2023 सीझनमध्ये मंधानाने वैयक्तिक कारणांमुळे आपले नावमागे घेतले होते. डब्ल्यूबीबीएलमध्ये तिने आतापर्यंत 38 सामन्यांच्या 36 डावांमध्ये 24.50 च्या सरासरीने 784 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचाही समावेश आहे.
टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने डब्ल्यूबीबीएलमध्ये सामील झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. तिने सांगितले की ती ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी उत्साहित आहे. ती म्हणाली “मी नेहमीच ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी उत्सुक आहे. ॲडलेड स्ट्रायकर्ससारख्या यशस्वी संघात योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी उत्सुक आहे.
स्मृती मंधानाला पुन्हा एकदा ॲडलेड स्ट्रायकर्समध्ये मुख्य प्रशिक्षक ल्यूक विल्यम्ससोबत काम करण्याची संधी मिळणार आहे, ज्यांनी आरसीबीला महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ल्यूकसोबत पुन्हा एकदा काम करण्याबाबत भारतीय खेळाडू म्हणाली की, ल्यूकसोबत काम करत राहण्यास मी रोमांचित आहे. आमचे भूतकाळातील अनुभव खूप फायद्याचे आहेत आणि मी ते सुरू ठेवण्यास उत्सुक आहे.
हेही वाचा-
जय शहा आयसीसी अध्यक्ष झाले तर कोणाला जास्त फायदा होईल? सुनील गावस्कर स्पष्टच म्हणाले…
जय शहांची मोठी घोषणा! देशांतर्गत स्पर्धेतील खेळाडूही होणार मालामाल
‘मी विराट भैय्यासोबत कधीच..’, रिंकू सिंगची किंग कोहलीबद्दल भावनिक प्रतिक्रिया