---Advertisement---

Ranji Trophy; आदित्य ठाकरे विदर्भाकडून खेळणार रणजी सामने, पाहा विदर्भाचा 16 सदस्यीय संघ

On: गुरूवार, जानेवारी 4, 2024 1:55 PM
Vidharbha-Cricket-Team
---Advertisement---

Ranji Trophy: 2024 च्या रणजी हंगामाला 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. अकोल्याच्या दोन खेळाडूंचा यावेळी रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये दर्शन नळकांडे आणि आदित्य ठाकरे याची निवड झाली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेचा हा 89वा हंगाम असून दोन वेळचा विजेता विदर्भ संघ पुन्हा एकदा कमाल दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

अक्षय वाडकर हा संघाचा कर्णधार आहे आणि त्याचबरोबर तो एक यष्टीरक्षक सुद्धा आहे. विदर्भ संघाने 2017-18 आणि 2018-19 असे सलग दोन वर्ष विजेतेपद मिळवले आहे. त्यावेळी संघाची धुरा फैज फजल या खेळाडूकडे होती. या हंगामासाठी विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

या स्पर्धेसाठी विदर्भाने 17 सदस्यीय संघाची निवड केली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव देखील विदर्भाकडून यावेळी रणजी खेळताना दिसेल. त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. माजी कर्णधार फैज फझल, यष्टीरक्षक जितेश शर्मा, शुभम दुबे, यांच्याकडे फलंदाजीची धुरा असेल. फिरकीपटूंमध्ये हर्ष दुबे, अक्षय वखारे, आदित्य सरवटे यांच्यावर असेल तर वेगवान गोलंदाजाची धुरा उमेश यादव, यश ठाकूर, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे यांच्यावर धुरा असेल. (Ranji Trophy Aditya Thackeray to play Ranji matches for Vidarbha see Vidarbha’s 16-member squad)

कसे असेल विदर्भ संघाचे रणजीचे वेळापत्रक:
पहिला सामना: 5 जानेवारी 2024, विदर्भ विरुद्ध सर्विसेस, व्हिसीए स्टेडीयम, नागपूर
दुसरा सामना: 12 जानेवारी 2024, विदर्भ विरुद्ध मनिपूर, शास्त्री मैदान, गुजरात
तिसरा सामना: 19 जानेवारी 2024, विदर्भ विरुद्ध सौराष्ट, व्हिसीए स्टेडीयम, नागपूर
चौथा सामना: 26 जानेवारी 2024, विदर्भ विरुद्ध झारखंड, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम, झारखंड
पाचवा सामना: 2 फेब्रुवारी 2024, विदर्भ विरुद्ध राजस्थान, सवाई मानसिंग इंदोर स्टेडियम, जयपूर
सहावा सामना: 9 फेब्रुवारी 2024, विदर्भ विरुद्ध महाराष्ट्र, एमसीए स्टेडियम, पुणे
सातवा सामना: 16 फेब्रुवारी 2024, विदर्भ विरुद्ध हरियाणा, व्हिसीए स्टेडीयम, नागपूर

हेही वाचा

IND vs SA: सिराजची घातक गोलंदाजी पाहून सूर्यकुमार झाला भलताच खूश, इन्स्टा स्टोरी शेअर करत दिलं खास कॅप्शन
ICCने केली ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’साठी खेळाडूंची घोषणा, भारताच्या ‘या’ स्फोटक सलामीवीराचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---