वनडे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलिया मंगळवारी (7 नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर इब्राहिम जादरान विश्वचषक स्पर्धेत शतक करणारा पहिला अफगाणिस्तानी फलंदाज ठरला. तसेच शेवटच्या षटकांमध्ये राशिद खान याने वादळी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीमुळे अफगाणिस्तानने 50 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 291 धावा केल्या.
अफगाणिस्तानसाठी या सामन्यात रहमनुल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम जादरान () डावाची सुरुवात करण्यासाठी खेळपट्टीवर आले. रहमनुल्लाहाने वैयक्तिक 21 धावा करून डावातील आढव्या षटकात विकेट गमावली. त्यानंतर रहमत शाह फलंदाजीसाठी आला आणि 30 धावा करून त्यानेही 25व्या षटकात विकेट गमावली. चौथ्या क्रमांकावर कर्णधार हरमतुल्लाह शाहिदी फलंदाजीसाठी आला आणि त्याने 26 धावांची खेली केली. आझमतुल्लाह अमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी अनुक्रमे 22 आणि 12 धावा केल्या. राशिद खान याने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या 18 धावांमध्ये 35 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झॅम्पा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट गमावली. जोश हेझलवूड याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (Afghanistan post 291/5 against Australia at the Wankhede Stadium)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, ऍडम झम्पा
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप 2023मध्ये कुणीच नाही रोहितच्या आसपास, बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा पहिलाच भारतीय
वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेल्या श्रीलंकन संघाला सुट्टी नाही! एसएलसीचे नवे अध्यक्ष लावणार सर्वांना शिस्त