AFG Vs IRE : तुम्ही क्रिकेटच्या जगात अनेकदा भाऊ-भावाची जोडी पाहिली असेल. तसेच पिता-पुत्राची जोडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असल्याबद्दल तुम्हीही ऐकले असेल. पण क्रिकेटच्या मैदानावर काका-पुतण्याची जोडी खेळताना फार कमी ऐकले असेल. सध्या असाच एक खास क्षण 28 फेब्रुवारी बुधवारी आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीत पाहायला मिळाला आहे.
तर या सामन्यात अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात करण्यासाठी दोन जादरान मैदानात एकत्र आले होते. त्यापैकी एक काका आणि दुसरा पुतण्या होता. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की इथे काकापेक्षा पुतण्याच जास्त अनुभवी असलेला पहायला मिळत आहे. तसेच आयर्लंडविरुद्धच्या या सामन्यात नूर अली झद्रान केवळ 7 धावा करून बाद झाला. पण इब्राहिमने शानदार अर्धशतक झळकावत 53 धावांची खेळी केली आहे.
याबरोबरच, आपला दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या 35 वर्षीय नूर अली जादरान आणि टी-20 मध्ये संघा कर्णधार असून तो त्याचा सातवा कसोटी सामना खेळत असलेल्या इब्राहिम जादरानबद्दल बोलत आहोत. 22 वर्षीय इब्राहिम वयाने नूर अली जादरानपेक्षा खूपच लहान आहे. पण अनुभवात तो त्याचा काका नूर अली जादरानपेक्षा पुढे आहे. तसेच जर आपण दोघांच्या अनुभवाबद्दल बोललो तर नूर अली जादरान वयाने नक्कीच मोठा आहे. पण त्याने अफगाणिस्तानसाठी दोन कसोटी, 51 एकदिवसीय आणि 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
तर 2009 मध्ये नूरने वनडे फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यावेळी इब्राहिम जादरान अवघ्या 7 किंवा 8 वर्षांचा होता. यानंतर इब्राहिम झद्रानने 2019 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले असून तो त्याच्या काकांपेक्षा जास्त कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. तसेच वनडेतही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तर नूरने फेब्रुवारी 2024 मध्ये कसोटी पदार्पण केले तर इब्राहिमने सप्टेंबर 2019 मध्ये कसोटी पदार्पण केले आहे.
Ibrahim Zadran opening with his uncle Noor Ali Zadran in a Test match.
– Ibrahim handed the Test cap to his uncle Noor a few weeks back. pic.twitter.com/kyBIMAG3B8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 28, 2024
दरम्यान, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता. मात्र स्थानिक शालेय क्रीडा स्पर्धेमुळे अखेरच्या क्षणी सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. त्यामुळे अबू धाबी स्कूल स्पोर्ट्स चॅम्पियनशिपने आपल्या स्पर्धेसाठी झायेद स्टेडियमची निवड केली होती. त्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंडमधील कसोटी सामना टॉलरन्स ओव्हल स्टेडियममध्ये हलवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : कसोटी मालिका गमावल्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वाचला चुकांचा पाढा, अन् सांगितलं नेमकी कुठे झाली गडबड
- ICC Rankings : जयस्वालची क्रमवारीतही ‘यशस्वी‘ प्रगती; अन् गिल आणि जुरेल यांनाही झाला मोठा फायदा