अफगाणिस्तानचा जादुई फिरकी गोलंदाज राशिद खानने काल म्हणजेच (20 सप्टेंबर) रोजी 26 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्याने अशी कामगिरी केला. जी एकदिवसीय क्रिकेटच्या 53 वर्षांच्या इतिहासात कोणताही गोलंदाज करू शकला नाही. अफगाणिस्तान संघ शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. ज्यात त्यांनी 177 धावांनी मोठा विजय नोंदवला. अफगाणिस्तानच्या या विजयात राशिद खानने महत्त्वाची भूमिका बजावली. ज्याने एक-दोन नव्हे तर सर्व 5 आफ्रिकेचे फलंदाजांना माघारी पाठवले. यासह राशिद खान वाढदिवसानिमित्त एकदिवसीय सामन्यात 5 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या आधी दोन गोलंदाजांनी त्यांच्या वाढदिवशी 4-4 विकेट घेतल्या होत्या.
राशिद खानच्या आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये वाढदिवसानिमित्त सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या व्हर्नन फिलँडरच्या नावावर होता. ज्याने 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध केवळ 12 धावांत चार बळी घेतले होते. तर 2010 मध्ये स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 44 धावा देऊन तितक्याच विकेट घेतल्या होत्या.
Five wicket haul by the birthday boy – Rashid Khan. pic.twitter.com/tcOrPHkkrs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 20, 2024
वाढदिवसादिवशी वनडेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी-
राशिद खान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5/19, शारजाह, 2024*
व्हर्नन फिलँडर विरुद्ध आयर्लंड, 4/12, बेलफास्ट, 2007
स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 4/44, कार्डिफ, 2010
अफगाणिस्तानने दुसरी वनडे 177 धावांनी जिंकून वनडे मालिकेत प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. यापूर्वी, 2019 आणि 2023 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने केवळ दोनच वेळा दक्षिण आफ्रिकेचा सामना केला होता आणि या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेतील पहिला सामना जिंकून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेवर पहिला विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यातही त्यांनी आफ्रिकन संघाचा पराभव करत मालिका जिंकली. ती सामन्यांच्या मालिकेत आता अफगाणिस्तानने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा-
‘रशीद’ आणि ‘गुरबाज’समोर आफ्रिकन संघाचे लोटांगण, अफगाणिस्तानने रचला इतिहास; मालिका ताब्यात
विराट कोहलीची शतकाची भूक संपली! शेवटची सेंच्युरी कधी केलीय?
IND vs BAN: टीम इंडिया बांगलादेशला किती धावांचे टार्गेट देऊ इच्छिते? रवींद्र जडेजाने सांगितलं