सध्या बांगलादेशमध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान वनडे मालिका खेळली जात आहे. चट्टोग्राम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या अफगाणिस्तान संघाने 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांची ही मालिका एक सामना शिल्लक असतानाच खिशात घातली. या पराभवामुळे बांगलादेशवर आठ वर्षानंतर मायदेशात वनडे मालिका गमावण्याची वेळ आली. तसेच, हा अफगाणिस्तानच्या वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.
Afghanistan secure a massive win and with it an unassailable 2-0 lead against Bangladesh in the ODI series 🔥#BANvAFG | https://t.co/mvFeGdwCsz pic.twitter.com/v4FRjgI3sF
— ICC (@ICC) July 8, 2023
चट्टोग्राम येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघ 1-0 अशा आघाडीसह उतरला होता. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांनी 36.1 षटकात 256 धावांची मोठी सलामी दिली. इब्राहिम शतक करून लगेच बाद झाला. त्यानंतर गुरबाजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना 145 धावा कुटल्या. यानंतर मात्र अफगाणिस्तानचा डाव घसरला. अखेरच्या 13 षटकात 72 धावांमध्ये त्यांचे अखेरचे आठ गडी बाद झाले.
विजयासाठी मिळालेल्या 332 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना फझलहक फारूख व मुजीब रहमान यांनी सुरुवातीपासूनच यजमान संघाचे कंबरडे मोडले. बांगलादेशचे पहिले सहा फलंदाज केवळ 72 धावांमध्ये परतलेले. अनुभवी मुशफिकुर रहीम याने अर्धशतक झळकावत बांगलादेशचा डाव सावरला. त्याने 69 धावांची खेळी केली .राशिद खान याने देखील दोन बळी मिळवत अफगाणिस्तानचा डाव 189 वर संपुष्टात आणला. गुरबाज याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Afganistan Beat Bangladesh By 142 Runs In Chattogram ODI Clinch Series Gurabaz Shines)
महत्वाच्या बातम्या-
कॅरेच्या हेअरकटच्या पैशांवरून वातावरण तापले! धमकी अन् इंग्लिश मीडियाच्या बातमीनंतर स्मिथकडून पोलखोल
वॉर्नरच्या Thread पोस्टवर कमिन्सने सल्ला देताच लोटपोट झाला रिषभ पंत; म्हणाला, ‘भावा…’