वनडे विश्वचषक स्पर्धेतील 11व्या दिवशी 13 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमनेसामने आलेले. हा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअममध्ये खेळला गेला. अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करत गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केले. अफगाणिस्तानचा वनडे क्रिकेट विश्वचषक इतिहासातील केवळ दुसरा विजय ठरला.
https://www.instagram.com/reel/CybPSezsIp5/?igshid=MzRlODBiNWFlZA==
या सामन्यात अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. त्यांचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांनी 114 धावांची भागीदारी करत जोरदार सुरुवात करून दिली. गुरबाजने 80 धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर मात्र अफगाणिस्तानची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळत असलेल्या इक्रम अली खिल याने शानदार अर्धशतक करत अफगाणिस्तानला 284 अशी मोठी मजल मारून इंग्लंडसाठी आदिल रशीदने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टो याच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर जो रूट, डेव्हिड मलान, जोस बटलर व लियाम लिव्हिंगस्टोन हे नियमित अंतराने बाद झाल्याने इंग्लंड संघ अडचणीत सापडला. मात्र हॅरी ब्रूक यांनी एक बाजू लावून धरली व अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो आठव्या क्रमांकावर बाद झाला. त्यानंतर राशिद खानने उर्वरित दोन बळी मिळवत अफगाणिस्तानला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
(Afganistan Creat History Beat England In OXI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
हम खडे, तो सबसे बडे! रोहितच्या 6 षटकारांनी रचला मोठा Record, सचिनसह स्वत:चे 3 विक्रम काढले मोडीत
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ पठ्ठ्या ठरला फिल्डर ऑफ द मॅच, शार्दुलच्या हस्ते सन्मान