भारत दीर्घकाळापासून आशियातील सर्वोत्तम संघ आहे. टीम इंडिया सध्या वनडे आणि टी20 या दोन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 टीम आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्या कामगिरीत मोठी घसरण पहायला मिळाली आहे. परंतु गेल्या दशकात, एक आशियाई संघ उदयास आला आहे जो अगदी मोठ्या संघांना, विशेषत: टी20 फॉरमॅटमध्ये टक्कर देत आहे. जर आपण टी20 विश्वचषक 2024 वर नजर टाकली तर भारतानंतरचा दुसरा सर्वोत्तम संघ पाकिस्तान किंवा श्रीलंका नसून अफगाणिस्तान आहे, जो सुपर-8 मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे.
यंदाच्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये सात आशियाई संघ सहभागी आहेत. यापैकी आतापर्यंत फक्त भारतीय संघच सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. तर अफगाणिस्तान या विश्वचषकात आशियातील दुसरा सर्वोत्तम संघ ठरला आहे. ओमान आधीच बाहेर पडला आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळ हे देश सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान ‘क’ गटात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने पुढच्या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा पराभव केल्यास तो थेट सुपर-8 साठी नक्की पात्र ठरेल.
अफगाणिस्तानला ‘क’ गटात ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिजने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकून सुपर-8 साठी पात्रता मिळवली आहे. अफगाण संघाने आतापर्यंत युगांडाचा 125 धावांनी आणि न्यूझीलंडचा 84 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे, ज्यामुळे त्यांचा नेट रनरेट +5.225 आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानने पुढचे दोन सामने गमावले तरी ते सुपर-8 मध्ये पात्र ठरु शकतात. अफगाणिस्तानला आजपर्यंत टी20 विश्वचषकाच्या बाद फेरीपर्यंत पोहोचता आलेले नसले तरी यावेळी संघाची यंदाची लय पाहता अफगाणिस्तानला टी20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकल्याशिवाय मायदेशी परतायचे नाही, असे दिसते आहे.
महत्तवाच्या बातम्या-
भारतीय संघाची सुपर-8 मधील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, पाहा एका क्लिकवर!
फ्लोरिडातील पुढील तीनही सामने पावसामुळे वाहून जातील का? भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार की नाही?
माणूस आहे की पक्षी! मोहम्मद सिराजने हवेत उडी मारत घेतला अविश्वसनीय झेल!