अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीला बुधवारी (११ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान नियमाचे उल्लंघन केल्याचा फटका बसला आहे. यामुळे त्याच्या सामन्याच्या फिमधील १५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) आचारसंहितेनुसार स्तर एकमध्ये दोषी आढळला आहे. सामन्यादरम्यान पंचांचे आदेश न मानणे, त्यांचा नियमांना नाकारणे याचा त्यामध्ये समावेश आहे.
आर्थिक दंडाबरोबर नबीला एक डिमेरिट पॉइंटही मिळाला आहे. मागील २४ महिन्यांमध्ये पहिला दंड असल्यामुळे त्याला हा डिमेरिट पॉइंट मिळाला आहे. ही घटना अफगाणिस्तानची फलंदाजी सुरू होती तेव्हा घडली. त्यामध्ये १४व्या षटकावेळी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने हातात घातलेल्या बॅंडमुळे नबी पंचांशी हुज्जत घालत होता.
मैदानावर असलेल्या पंचांनी तो वाद वाढवण्याचे टाळले, ते आयसीसीच्या नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणात मैदानी पंच जयरामन मदनगोपाल आणि शरफुद्दौला इब्ने यांच्यासह थर्ड-अंपायर नितीन मेनन आणि चौथे पंच केएन अनंतपद्यनाभन यांनी नबीवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला.
नबीनेही त्याची चूक कबूल केली आहे. खेळाडूंनी त्यांचे आरोप मान्य केले तर औपचारिक सुनवाई (फॉर्मल हियरिंग) नाही केली जात आणि मॅच रेफरीचा निर्णय अंतिम मानला जातो. आयसीसीच्या स्तर एकमध्ये दोषी आढळल्यास सामन्याची ५० टक्के फि कपात आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट जोडले जातात. नबीचा व्यवहार पाहता त्याच्यावर फि कपातीची कारवाई केली गेली.
खेळाडूला डिमेरिट पॉइंट मिळाला असता खेळाडूचे वर्तन २४ महिने झाल्यानंतर चांगले असले तर ते हटवलेही जाते. तसेच या महिन्यांमध्ये खेळाडूला ४ डिमेरिट पॉइंट मिळाले, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना ४० षटकांनंतर बरोबरीत राहिला. त्यामुळे पहिली सुपर ओव्हर खेळली गेली, जी बरोबरीत राहिली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने २३ धावा केल्या होत्या. तेव्हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने ३ षटकार मारले, मात्र शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला आणि दक्षिण आफ्रिका जिंकला.






