पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी अखेर अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्लाह शाहिदी हा करेल. अष्टपैलू करीम जनत हा तब्बल सहा वर्षानंतर वनडे संघात सामील झाला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर अफगाणिस्तानने आशिया चषकासाठी आपला संघ घोषित केला. मधल्या फळीतील फलंदाज शाहिदी हा संघाचे नेतृत्व करणार आहे. यासोबतच सलामीवीर गुरुबाज, नजीब व रहमान शाह संघाची फलंदाजी मजबूत करतील. अफगाणिस्तान संघाची मदार प्रामुख्याने फिरकी तिकडी राशिद खान, मोहम्मद नबी व मुजीब उर रहमान यांच्यावर असेल. त्यांना युवा नूर अहमद साथ देईल. वेगवान गोलंदाजीत फजलहक फारुकी व गुलबदीन नईब हे नेतृत्व करतील. अष्टपैलू करीम जनत याचा 2017 नंतर प्रथमच वनडे संघात समावेश केला गेला. त्याने अफगाणिस्तानसाठी आत्तापर्यंत केवळ एक वनडे सामना खेळला आहे.
Here’s AfghanAtalan’s lineup for the ACC Men’s Asia Cup 2023. 🤩#AfghanAtalan | #AsiaCup2023 pic.twitter.com/kHHmR2GhxO
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 27, 2023
आशिया चषकासाठी अफगाणिस्तान संघ:
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झादरान, रियाझ हसन, रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, नजीब झादरान, रशिद खान, इक्रम अली खिल, करीम जनत, गुलबदीन नईब, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, मोहम्मद अशरफ, नूर अहमद, अब्दुल रहमान आणि सफी सलीम.
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या खेळाडूबाबत धक्कादायक ब्रेकिंग! स्टार फलंदाज नाही घेणार श्रीलंकेसाठी भरारी, पण का?
हेडनने निवडली वर्ल्डकपसाठी टीम इंडिया! सॅमसनला संधी तर, हुकमी एक्का केला बाहेर
(Afghanistan Annouced Squad For Asia Cup Karin Janat Backs After 6 Years)