Afghanistan bans 3 players: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोमवारी (दि. 26 डिसेंबर) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला. अफगाणिस्ताने 3 खेळाडूंवर बंदी घातली. त्या तीन खेळाडूंमध्ये मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांचा समावेश आहे. त्यांच्यावर फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी का घातली गेली आहे, हे जाणून घेऊयात…
मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman), फजलहक फारुकी (Fazalhaq Farooqi) आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांच्यावरील बंदीचे मोठे कारण आहे. ते असे की, अफगाणिस्तानसाठी खेळण्याऐवजी हे खेळाडू आपल्या वैयक्तिक हिताला प्राथमिकता देत होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) या तिन्ही खेळाडूंचा केंद्रीय करार थांबवला आहे. पुढील 2 वर्षांपर्यंत त्यांना टी20 लीग खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासही नकार दिला आहे. तसेच, आगामी स्पर्धा खेळण्यासाठीही त्यांना जी एनओसी मिळाली आहे, तीदेखील रद्द करण्यात आली आहे. अशात या खेळाडूंचे आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेत खेळणे कठीण झाल्याचे दिसत आहे.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
The ACB has decided to delay the annual central contracts and opt not to grant NOCs to three national players, @Mujeeb_R88, @fazalfarooqi10 and Naveen Ul Haq.
Full Details 👉: https://t.co/FKECO8U7Ba pic.twitter.com/GMDaTzzNNP
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 25, 2023
एसीबी बोर्डाच्या निवेदनानुसार, तिघांनी अलीकडेच बोर्डाला 1 जानेवारी, 2024पासून सुरू होणाऱ्या नवीन वार्षिक केंद्रीय करारातून मुक्त होण्याची इच्छा सांगितली. तसेच, त्यांनी फ्रँचायझी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संमती मागितली होती. खेळाडूंच्या या निर्णयाने बोर्डाचा पारा चढला आणि त्यांना यांच्याविरुद्ध कठोर निर्णय घेतला.
बोर्ड म्हणाले की, “या खेळाडूंसाठी केंद्रीय करारावर स्वाक्षरी न करण्यामागील कारण कमर्शियल लीग्स खेळणे होते, जे अफगाणिस्तानसाठी खेळण्याऐवजी त्यांच्या वैयक्तिक हितांना प्राथमिकता देत होते, जी एक राष्ट्रीय जबाबदारी मानली जाते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.”
पुढे ते असेही म्हणाले की, “अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा निर्णय एसीबीच्या मूळ मूल्ये आणि सिद्धांतानुसार, राष्ट्रीय प्राथमिकतांवर लक्ष केंद्रित करत घेतला गेला आहे. हा प्रत्येक खेळाडूसाठी एसीबीचे सिद्धांत कायम राखणे आणि आपल्या वैयक्तिक हितांना बाजूला ठेवत देशाच्या हिताला प्राथमिकता देण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकतो.”
खरं तर, अलीकडेच आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुजीब उर रहमानला आपल्या ताफ्यात घेतले होते. तसेच, नवीन लखनऊ सुपर जायंट्सचा, तर फारुकी सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे. अशात जर या तिघांवरील ही बंदी लवकर हटवली गेली नाही, तर तिन्ही फ्रँचायझींसाठी हा मोठा धक्का ठरेल. आता पुढे काय होते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (afghanistan ban mujeeb ur rahman naveen ul haq fazalhaq farooqi set to miss ipl 2024 know the reason)
हेही वाचा-
Boxing Day Test म्हणजे काय आणि कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवर
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उस्मान ख्वाजाला कर्णधार पॅट कमिन्सचा पाठिंबा, म्हणाला, ‘आयसीसी जे नियम बनवते ते…’