---Advertisement---

‘मला एका डोळ्याने कमी दिसत होतं…’, शाकिबने सांगितले वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनामागील धक्कादायक कारण

Shakib-Al-Hasan
---Advertisement---

Shakib Al Hasan Blurred Vision: वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला संपून एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. या स्पर्धेत अनेक संघांनी खराब प्रदर्शन केले होते. त्यात बांगलादेश संघाचाही समावेश होता. मात्र, आता बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या खराब प्रदर्शनाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शाकिबने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की, विश्वचषकादरम्यान त्याला एका डोळ्याने कमी दिसत होते. त्याच्यानुसार, त्याच्या डाव्या डोळ्यात काहीतरी समस्या होती.

शाकिब अल हसनचे विधान
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने एक हैराण करणारा खुलासा केला आहे. क्रिकबझशी बोलताना त्याने सांगितले की, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेदरम्यान त्याच्या डाव्या डोळ्यात त्रास होता. यामागील कारण तणाव होते.

शाकिब म्हणाला की, “असे नाहीये की, फक्त एक किंवा दोन सामन्यांदरम्यान ही समस्या होती. खरं तर, संपूर्ण विश्वचषकादरम्यान माझ्या डाव्या डोळ्यात समस्या होती. मी फक्त एका डोळ्याने खेळत होतो आणि अंदाज लावून चेंडू मारत होतो. मला चेंडूंचा सामना करण्यात खूप अडचणीचा सामना करावा लागला होता. जेव्हा मी डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा माझ्या रेटिनामध्ये पाणी होते. त्यांनी माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकले आणि म्हटले की, मला तणाव कमी करावा लागेल.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “मला माहिती नाही की, यामागील कारण काय होते. मात्र, विश्वचषकानंतर जेव्हा मी पुन्हा अमेरिकेला तपासणीसाठी गेलो, तेव्हा कोणताही तणाव नव्हता. मी डॉक्टरांना म्हणालो की, विश्वचषकही नाहीये, तर तणावही नाहीये.”

शाकिबचे विश्वचषकातील प्रदर्शन
शाकिबचे विश्वचषकातील प्रदर्शन पाहायचे झाले, तर त्याने तितकी चांगली कामगिरी केली नव्हती. त्याने 7 सामन्यात 26.57च्या सरासरीने फक्त 186 धावाच केल्या होत्या. बांगलादेश संघाचे प्रदर्शनही यामुळे खराब राहिले होते. तसेच, संघाला अनेक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. शाकिबच्या बोटाला विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापतही झाली होती. तो सध्या या दुखापतीतून सावरत आहे. (bangladesh cricketer shakib al hasan discloses he played 2023 world cup with blurred vision)

हेही वाचा-
ब्रेकिंग! अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ‘या’ 3 खेळाडूंवर घातली बंदी, देशाऐवजी पाहत होते स्वत:चं हित
Boxing Day Test म्हणजे काय आणि कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---