सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीने (ICC Champions Trophy 2025) सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य वेधून घेतले आहे. तत्पूर्वी अफगाणिस्तान विरूद्ध इंग्लंड संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. यासह, इंग्लंडचा संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे.
अफगाणिस्तानने सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात प्रथम खेळताना अफगाणिस्तान संघाने 325 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झादरानने (Ibrahim Zadran) 177 धावांची ऐतिहासिक खेळी केली. प्रत्युत्तरात, इंग्लंडच्या जो रूटने (Joe Root) इंग्लंडकडून शानदार शतक झळकावले परंतु, तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान इब्राहिम झादरानने 177 धावा केल्या, जी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. काही दिवसांपूर्वीच याच मैदानावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडने ठेवलेले 352 धावांचे विक्रमी लक्ष्य गाठले. पण इंग्लंडने फारशी ताकद दाखवली नाही कारण अफगाणिस्तानच्या घातक गोलंदाजीमुळे त्यांचे फलंदाज शेवटच्या 3 षटकांत घाम गाळताना दिसले.
47व्या षटकाबद्दल बोलायचे झाले तर, 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 7 विकेट्स गमावून 301 धावा केल्या होत्या. आता संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 25 धावा करायच्या होत्या. 46व्या षटकात 120 धावांवर जो रूटने आपली विकेट गमावली. अशा परिस्थितीत इंग्लंडला अष्टपैलू जेमी ओव्हरटन संघाला विजयाकडे नेईल अशी अपेक्षा होती.
पण शेवटच्या 3 षटकांत, अझमतुल्ला उमरझाई आणि फजल हक फारुकी यांच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा खालचा क्रम कोसळला. 48व्या षटकात उमरझाईने ओव्हरटनची विकेट घेतली. पुढच्याच षटकात फारुकीने जोफ्रा आर्चरला बाद केले. 50 षटके पूर्ण होण्यापूर्वी आदिल रशीद बाद झाला. अशाप्रकारे, अफगाण संघाने शेवटच्या 3 षटकांत सामना फिरवला आणि 8 धावांनी शानदार विजय मिळवला.
अफगाणिस्तानच्या या शानदार विजयामुळे इंग्लंडचा संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडला आहे. तर अफगाणिस्तान संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. आता अफगाणिस्तानचा पुढचा सामना दिग्गज ऑस्ट्रेलियासोबत आहे. दरम्यान दोन्ही संघ (28 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असतील. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे देखील मनोरंजक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटमध्ये ‘या’ 3 संघांनी झळकावली सर्वाधिक शतके! पहिल्या स्थानी कोण?
यूपीचा खराब खेळ, 9 षटकांत 80 धावांवरून 142 धावांपर्यंत मजल; 7 खेळाडूंची निराशा
बाबर आझमला माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला गुरूमंत्र…! बाबरच्या बॅटमधून पडणार धावांचा पाऊस?