संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (24 फेब्रुवारी) खेळला गेला. शारजा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघाने इतिहास रचत पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केले. कोणत्याही स्तरावर अफगाणिस्तानने पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. अफगाणिस्तानच्या विजयाचा नायक अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी ठरला.
https://www.instagram.com/p/CqMHmQyJBAj/?igshid=YmMyMTA2M2Y=
अफगाणिस्तान यजमानपद भूषवत असलेली ही मालिका युएई येथे खेळली जात आहे. शादाब खानच्या नेतृत्वात उतरलेल्या पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. अफगाणिस्तानच्या सर्वच गोलंदाजांनी आपल्याला टी20 स्पेशालिस्ट का म्हणतात हे दाखवून देत पाकिस्तानला नियमित अंतराने धक्के दिले. अफगाणिस्तानसाठी गोलंदाजी केलेल्या सर्व सहा गोलंदाजांनी बळी मिळवत पाकिस्तानचा डाव 20 षटकात 9 बाद 92 असा रोखला. पाकिस्तानसाठी सर्वाधिक 18 धावा इमाद वसीम याने केल्या.
एका ऐतिहासिक विजयासाठी मिळालेल्या या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानच्या सलामीवीरांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत या सामन्यात झुंज देण्याचा प्रयत्न केला. पदार्पण करणाऱ्या ऐहसानुल्लाहने एका षटकात दोन बळी मिळवले. 10 षटकात 4 बाद 45 धावसंख्या झालेली असताना अफगाणिस्तान संघ अडचणीत सापडला होता.
अडचणीत सापडलेल्या संघाला बाहेर काढण्यासाठी माजी कर्णधार व अनुभवी मोहम्मद नबी व नजीब झादरान हे उभे राहिले. दोघांनीही संयमाने फलंदाजी करत पाकिस्तानला आणखी यश मिळू दिले नाही. दोघांनीही 54 भावांची नाबाद भागीदारी करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. दोन बळी व 38 धावा करणारा नबी सामनावीर ठरला. उभय संघांमध्ये खेळलेल्या यापूर्वीच्या चार वनडे व तीन टी20 सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय साजरा केला होता.
(Afghanistan Beat Pakistan In International Cricket First Time Afghanistan Won By 6 Wickets In Sharjah T20I Mohammad Nabi Shines)