टी20 विश्वचषक 2024 च्या 29 व्या सामन्यात अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीला 7 विकेट्सनी मात दिला आहे. या विजयासह अफगाणिस्तान संघ सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. राशिद खानच्या नेतृत्तवाखाली अफगाणिस्तान संघाने स्पर्धेत शानदार कामगिरी केला आहे. यंदाच्या विश्वचषकात सलग तीन सामने जिंकून टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा सुपर-8 साठी संघ पात्र ठरला आहे.
अफगाणिस्तानने टाॅस जिंकून पापुआ न्यू गिनीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमत्रंण दिले,संघाने अफगाणच्या गोलंदाजासमोर संघर्ष करत 19.5 षटकात केवळ95 धावा करु शकले. अफगाणिस्तानने अवघ्या 15.1 षटकांत 3 गडी राखून लक्ष्य गाठले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानची गोलंदाजी आग ओकत आहे. फजलहक फारुकीने कहर केले आहे. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 12 विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यातही फारुकीने 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या, नवीन-उल-हकने 2 गडी टिपून फजलहक फारुकीला चांगली साथ दिले.
धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून सर्वाधिक गुबाल्डिन नायबने 36 चेंडूत 49* धावा केल्या. याशिवाय, मोहम्मद नबीने 23 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला. 96 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने केवळ 15.1 षटकात गाठून 7 विकेट्स राखून सामन्यावर विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तान सुपर-8 फेरी गाठली आहे.
सुपर-8 च्या फेरीत 20 जून रोजी भारत अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. हा सामना बारर्बाडोस येथे होईल. याअधी अफगाणिस्तानने त्यांच्या मागील दोन सामन्यात न्यूझीलंड आणि यूगांडाचा एकतर्फी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघास 75 धावांत तर यूगांडाला 58 धावांत सर्वाबाद केले आहे. अश्या स्थितीत भारताीय संघ समोर 20 जून रोजी अफगाणिस्तानचे कडवे अव्हान असणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्तान किंवा श्रीलंका नसून, ‘हा’ आहे आशियातील सर्वोतम दुसरा संघ, नाव ऐकून तूम्ही पण व्हाल अचंबित!
भारतीय संघाची सुपर-8 मधील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, पाहा एका क्लिकवर!
फ्लोरिडातील पुढील तीनही सामने पावसामुळे वाहून जातील का? भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार की नाही?